नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव अतिदुर्गम भागातील तेलखेडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील 13 गरोदर महिला सोनोग्राफी करण्यासाठी सकाळी निघाले असता शहादा तालुक्यातील लोणखेडा अभियंत्रिक महाविद्यालय समोर भीषण अपघात झाला यात 13 गरोदर महिला जखमी झाल्या आहेत
शहादा पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धडगाव अतिदुर्गम भागातील तेलखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रतून 102 रुग्णवाहिकेने येत असताना भरधाव वेगात चालाकाचे नियंत्रण सुटल्याने रुग्णवाहिका पलटी झाल्याने अपघात झाला. 13 गरोदर महिला पुरूष चालक असे 14 जण अपघातात जखमी झाले आहेत
आ. राजेश पाडवी यांच्या खासगी रुग्णवाहिकेतून जखमीना शहादा येथील नगर पालिकेचे शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व गरोदर मातेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे त्यांच्यावर उपचार सुरू असून घटनास्थळी व रुग्णालयात नातेवाईकांनी धाव घेतली आहे








