नंदूरबार l प्रतिनिधी
येथील एस.ए.मिनिस्ट्रीज ट्रस्ट,संचलित एस.ए.मिशन हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात परीक्षा पे चर्चा अंतर्गत खा. डॉ.हीना गावित यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा योद्धा चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांची ताण तणावातून मुक्तता व्हावी याकरिता दरवर्षी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते या माध्यमातून केंद्र सरकारच्या शिक्षण विभागामार्फत या स्पर्धेचे नंदुरबार जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये नंदुरबार तालुक्यात काल या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा.ना.डॉ.विजयकुमार गावीत हे होते. कार्यक्रमाच्या आगमनावेळी फलकावर लावण्यात आलेल्या चित्रात रंग भरून विविध आकर्षक पोस्टर प्रदर्शित करण्यात आली होती.
प्रदर्शित पोस्टर्सची फीत कापुन कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, परीक्षा पे चर्चा या उपक्रमाचे समन्वयक जे.एन पाटील, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद मच्छिंद्र कदम, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सतीश चौधरी, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद डॉ. युनूस पठाण, मुख्याध्यापक संघ महाराष्ट्र राज्याचे सचिव युवराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील, आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री ना. डॉ.विजयकुमार गावित यांचा सत्कार संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. राजेश वळवी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देऊन करण्यात आला, जि. प.अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांचा सत्कार शिक्षणाधिकारी डॉ.माधव कदम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देऊन करण्यात आला.
सुरुवातीस उपस्थितासमोर शाळेच्या चमुने 26 जानेवारी निमित्ताने देशभक्तीपर गीत सादर केले,या स्पर्धेकरता एकूण 25 शाळांमधून 1456 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला हा जिल्ह्यातील सर्वोच्च विक्रम होय,ह्या विद्यार्थ्यांना G-20 जागतिक विश्वगुरू बनवण्याचा दृष्टीने भारताची वाटचाल, कोरोना लसीकरण मध्ये भारत नंबर एक, पंतप्रधानांच्या जनसेवेच्या विविध योजना आत्मनिर्भर भारत चुलीवरच्या धुराच्या त्रासातून मुक्त महिला-मोदींच्या संवेदनशील निर्णय सर्जिकल स्ट्राइक, स्वच्छ भारत अभियान, आजादी का अमृत महोत्सव, आंतरराष्ट्रीय योग दिन, बेटी बचाव बेटी पढाओ ह्या विषय स्पर्धेत देण्यात आले होते. याला विद्यार्थ्यांनी ही उत्तम प्रतिसाद देत आकर्षक चित्र काढली ह्या वेळी आपल्या अध्यक्षीय भाषण करतांना भविष्यात ही क्रीडा, कला, व अशाच विविध प्रकारच्या स्पर्धा दर सहा महिन्यांत जिल्हा स्तरावर घेऊन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा कला गुणांना संधी देण्याचा मानस आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सुप्त गुणांना वाव मिळेल ह्या त्यामागील मुख्य हेतू होय असे त्यांनी सांगितले ह्या स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधून एकूण तीन क्रमांक काढण्यात आले.
प्रथम क्रमांक डॉ.काणे येथील विद्यार्थीनी जागृती प्रकाश देवरे, द्वितीय क्रमांक अँग्लो उर्दु हायस्कूल येथील विद्यार्थीनी मारीया रफिक जहागीरदार, तृतीय क्रमांक डॉ.काणे गर्ल्स हायस्कूल ची विद्यार्थीनी भूमी किशोर पवार यांनी पटकावला. या विद्यार्थ्यांना मोमेंटो प्रमाणपत्र व चित्रकला किट देण्यात आले तर ह्या मध्ये प्रोत्साहन म्हणून टॉप टेन बक्षीसे मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि ड्रॉइंग किट देण्यात आली आणि सुपेरियर 25 विद्यार्थी प्रमाणपत्र व कीट देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित यांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांना यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत ज्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त करता आले नाही त्यांनी पुढे चांगले कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, उपशिक्षणाधिकारी डॉ.युनुस पठाण, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी सुद्धा फलकावर लावलेल्या चित्रांमध्ये रंग भरून कार्यक्रमाचा आनंद घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद दीक्षित यांनी केले तर आभार प्रदर्शन गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी केले.