नंदुरबार | प्रतिनिधी
मोबाईल सेल्समन सहाकार्यासोबत खांडबाराहून नंदुरबारकडे दुचाकीने येत असतांना तिघा अज्ञातांनी दुचाकीने त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून भादवड गावानजीक वाहन अडवून मारहाण करत त्यांच्याकडून मोबाईल्ससह रोकड असा सुमारे १ लाख ६८ हजार ऐवज लंपास केला या घटनेने नागरीकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.
नंदुरबार येथील मोबाईल सेल्यमन जैद अहमद जमरूद्दीन काझी (३२) रा.चिरागगल्ली यांनी दि.१७ जानेवारी रोजी नवापूर तालुक्यातील नवापूर, चिंचपाडा, विसरवाडी व खांडबारा येथे मोबाईल व्यावसायीकांकडे मोबाईल विक्रीची रक्कम व काही मोबाईल् जमा करून ते सायंकाळी त्यांचा मित्र विनोद माखिजा याच्यासोबत सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास दुचाकीने नंदुरबारकडे येत परतत होते. यावेळी अज्ञात तीन दुचाकीस्वारांनी त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग केला
. भादवड गावानजीक जैद काझी यांची दुचाकी थांबवून तोंडावर रूमाल बांधून, हातात लाकडी डेंगारा घेवून जैद काझी यांच्याकडून बॅगेची मागणी केली. काझी यांनी बॅग देण्यास नकार दिल्यानंतर तिघांनी मारहाण करून बॅग लंपास केली. सदर बॅगमध्ये ३० हजार रूपये रोख रक्कमेसह विविध कंपनीचे मोबाईल असा एकूण १ लाख ६८ हजार १७१ रूपये एकूण मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी हिसकावून नेत पसार झाले. मारहाणीत जैद काझी व साथीदार विनोद माखिजा हे दोघे किरकोळ जखमी झाले असून दोघांवर नंदुरबार जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले.
याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात भांदवि कलम ३९४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील करीत आहेत. घटनास्थळी पोलीस अधिक्षक पी.आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेय शाखेचे पोलीस नि रीक्षक किरण खेडकर, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्यासह पोलीस अंमलदार पथक यांची घटनास्थळी पाहणी केली.








