Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मकर संक्रांती-भोगी हा दिवस ‘पौष्टिक तृणधान्य दिन’ म्हणून साजरा करावा; कृषी विभागाचे आवाहन

team by team
January 11, 2023
in कृषी
0
मकर संक्रांती-भोगी हा दिवस ‘पौष्टिक तृणधान्य दिन’ म्हणून साजरा करावा; कृषी विभागाचे आवाहन
नंदुरबार  l
पौष्टिक तृणधान्य युक्त पदार्थाचा वापर आहारातील महत्व व त्याचे फायदे सर्वसामान्य लोकांना माहिती व्हावे यासाठी ‘मकर संक्रांती-भोगी’ हा दिवस दरवषी ‘पौष्टिक तृणधान्य दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पुणे कृषि आयुक्तालयाचे संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
पौष्टीक तृणधान्याचे महत्व सर्व जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी राज्यात “ आंतरराष्ट्रीय पौष्टिक वर्ष, 2023 ” साजरा करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केले आहे. त्याअनुषंगाने कृषि विभागामार्फत या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व सामान्य लोकांपर्यंत पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व, त्याचे फायदे काय आहेत या बरोबरच तृणधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढ कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.
या दिवशी प्रत्येक कृषि सहाय्यक आपल्या गावांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्राचे आयोजन, तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांचे लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्य पिकांपासून बनवण्यात येणारे विविध उपपदार्थ यांची माहिती देणे यासाठी प्रगतीशील शेतकरी,आहार तज्ञ, विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांना निमंत्रित करून कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत.
तसेच ज्या विभागांमार्फत बालके, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगारांना उपहारगृहातून फराळ, मध्यान्ह भोजन पूरविण्यात येते अशा विभागांनी या दिवशी त्यांच्या आहारांमध्ये पौष्टिक तृणधान्यांचा जाणीवपुर्वक वापर करावा, असे आवाहनही कृषि विभागाने केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

रजाळे ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी भाजपाच्या सुशिलाबाई पानपाटील विजयी

Next Post

आधारभूत किमतीत कडधान्य खरेदीला 15 जानेवारी पर्यंत वाढीव मुदतवाढ

Next Post
आधारभूत किमतीत कडधान्य खरेदीला 7 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

आधारभूत किमतीत कडधान्य खरेदीला 15 जानेवारी पर्यंत वाढीव मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

August 22, 2026
जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

August 22, 2026
हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

August 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add