म्हसावद l प्रतिनिधी
जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ मोठ्या स्पर्धांचे आयोजन नेहमीच होत असते.पण ग्रामीण भागातील गावांमध्ये शासनाकडून अशा मोठ्या स्पर्धाँचे आयोजन केले गेल्यास निश्चितच ग्रामीण भागातून देशपातळीवर प्रतिनिधित्व करणारे खेळाडू मिळतील,असे प्रतिपादन नंदुरबार जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी मच्छिन्द्र कदम यांनी मंदाणे ता.शहादा येथे केले.
महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक कल्याण संचालनालय,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा विभाग, नंदुरबार यांच्यावतीने व नंदुरबार जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने नाशिक विभागीय कबड्डी स्पर्धा मंदाणे ता.शहादा येथील पीपल्स एज्युकेशन संस्थेच्या आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात नुकत्याच पार पडल्या.तीन दिवस सुरु असलेल्या या स्पर्धेचे उदघाट्न नंदुरबार जिल्हा शिक्षण अधिकारी मच्छिन्द्र कदम,नाशिक क्रीडा उपसंचालक तथा नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील,तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी,पोलीस निरीक्षक राजन मोरे,जि.प.माजी सभापती अभिजित पाटील,जि.प.सदस्या मंगला जाधव,पं.स.सदस्या रोहिणी पवार,पं. स.सदस्य गोपी पावरा,माजी सरपंच अनिल भामरे,
सरपंच प्रतिनिधि पंडित पवार,संस्थेचे चेअरमन प्रा.जे.टी.पवार,व्हा. चेअरमन सत्तर पवार,सर्व संचालक,मुख्याध्यापक संघटनेचे सचिव पुष्पेंद्र रघुवंशी,वैद्यकीय अधिकारी डॉ.जितेंद्र पाटील,क्रीडा विभागाचे सहाय्य्क अधिकारी मुकेश बारी,आत्माराम बोथीकर,प्राचार्य सी.जि.पवार,जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष मयूर ठाकरे,जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सरचिटणीस राजेंद्र साळुंखे,तालुका क्रीडा अधिकारी महेंद्र कांटे,तालुका क्रीडा समन्वयक भालचंद्र चौधरी,केंद्र प्रमुख लक्ष्मण परदेशी आदिंच्या हस्ते झाले.
यावेळी शिक्षण अधिकारी मच्छिन्द्र कदम म्हणाले की,विभागीय स्पर्धेसारख्या मोठ्या स्पर्धा ग्रामीण भागात नेहमी घ्याव्यात जेणे करून ग्रामीण भागातून महान अथलेटिक्स हुसेन बोल्ट सारखा खेळाडू तयार होईल.जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील म्हणाल्या की,मंदाण्यासारख्या ग्रामीण भागात विभागीय स्पर्धासारख्या स्पर्धा ठेवल्यात तर तळागळातील खेळाडू पुढे येण्यास मदत होईल.मागील वर्षी मंदाणे सारख्या छोट्याशा गावातून एका खेळाडूची खेलो इंडियासाठी निवड झाली होती.असे अनेक खेळाडू अशा मोठ्या स्पर्धा ग्रामीण भागात ठेवल्यात तर आपले कौशल्य दाखवून पुढे येतील हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन ग्रामीण भागात ह्या विभागीय स्पर्धा ठेवण्यात आल्यात,असे सांगितले.
तसेच खेळ खेळत असताना सर्व खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवत खिलाडू वृत्तीने खेळले पाहिजे,असेही आवाहन केले. तहसीलदार डॉ.कुलकर्णी यांनी सांगितले की,आपल्या देशाचे खरे खेळ कबड्डी,खो-खो असून हे खेळ ग्रामीण भागात अशा स्पर्धेतून कायम जिवंत राहण्यास मदत होईल. माजी सभापती अभिजित पाटील,संस्थेचे चेअरमन प्रा. पवार आदींनी यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करीत शुभेच्छा दिल्यात.स्पर्धेत १४ वर्षे मुलांच्या गटात नाशिक जिल्हा विजेता व नंदुरबार जिल्हा उपविजेता झाला तर मुलींच्या गटात नाशिक जिल्हा विजेता व नाशिक मनपा उपविजेता बनला.१७ वर्षे मुलांच्या गटात जळगाव जिल्हा विजेता व धुळे जिल्हा उपविजेता बनला तर मुलींच्या संघात मालेगाव मनपा विजेता व नाशिक जिल्हा उपविजेता बनला.१९ वर्षे मुलांच्या गटात मालेगाव मनपा विजेता व धुळे मनपा उपविजेता बनला तर मुलींच्या गटात नाशिक जिल्हा विजेता व नाशिक मनपा उपविजेता बनला.सर्व संघांची राज्य पातळीवर निवड झाली.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून धुळे येथील रोहित सोनवणे,मयूर सोनवणे,भूषण शेलार,स्वप्नील नन्नवरे,अभिजित साळुंके,आशुतोष साळुंके,एस.के.पाटील,धीरज कुंवर,एस.आदींनी कामगिरी बजावली.स्पर्धा यशस्वीतेसाठी नंदुरबार जिल्हा क्रीडा विभाग,जिल्हा कबड्डी असोसिएशनचे राजेंद्र साळुंके,तालुका क्रीडा समन्वयक भालचंद्र चौधरी,शाळेचे प्राचार्य सी.जि.पवार, पर्यवेक्षक एम.जी.पाटील,क्रीडा शिक्षक पंकज पवार,प्रशिक्षक प्रा.दिनेश पवार,सर्व शिक्षक,शिक्षकेतर वृंद,वास्तव क्रीडा मंडळाचे दत्तात्रय साळुंके,मंडळाचे सर्व सदस्य, मंदाण्याचे आजी,माजी खेळाडू आदींचे सहकार्य लाभले.राज्य पातळीवर निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे,क्रीडा शिक्षक व प्रशिक्षकांचे मान्यवरांनी व ग्रामस्थांनी कौतुक केले.सूत्रसंचलन सेवा निवृत्त आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक प्रा.संपत कोठारी यांनी केले.








