Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे रोटरी गुणवंत पुरस्कार जाहीर

team by team
September 5, 2021
in शैक्षणिक
0

नंदुरबार l प्रतिनिधी

दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ नंदनगरीच्यावतीने शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या संस्थाचालक, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक यांना रोटरी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा या पुरस्कारात २ संस्थाचालक, ४ प्रशासकीय अधिकारी, १ शिक्षकेतर कर्मचारी तर १३ शिक्षकांचा समावेश आहे.
यंदा २०२१ या वर्षासाठी गुणवंत संस्थाचालक प्रा.मकरंद नगीन पाटील व पुष्पेंद्र गोवर्धन रघुवंशी तसेच प्रशासकीय क्षेत्रातील गुणवंत कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र व्ही. कदम, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी तसेच उपशिक्षणाधिकारी भानुदास रतिलाल रोकडे, शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठ महाविद्यालयाचा गुणवंत प्राध्यापक म्हणून प्रा.डॉ.माधव कदम (जीटीपी महाविद्यालय, नंदुरबार), प्रा.प्रमोद बुलाखी बागुल (आ.से.स.व शि.प्र.संस्थेचे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नवापूर) तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षक अनिल बाबुराव वायकर (शेठ के.डी. हायस्कुल, तळोदा), कालिदास गोपालकृष्ण पाठक (अश्वस्थामा माध्यमिक विद्यालय, धडगाव), हेमंत पुरुषोत्तम पाटील (श्रॉफ हायस्कूल, नंदुरबार), असिफ इकबाल आहद (अँग्लो उर्दू हायस्कूल नंदुरबार), शेख अकील शेख अहमद (कै.मोहनसिंग कन्हैयालाल रघुवंशी प्राथमिक शाळा नंदुरबार), मुख्याध्यापक शशिकांत पांडुरंग पाटील (विद्यासागर पब्लिक स्कूल नंदुरबार), करण उखाजी चव्हाण (नगरपालिका  शाळा क्र.४ नंदुरबार), सपना सयाजीराव हिरे (जिल्हा परिषद शाळा अंबापुर नंदुरबार), पी.जी.पाटील (शासकीय आश्रम शाळा धडगाव), रोहिदास वाघ (जि.प.शाळा मोलगी), जयेश लक्ष्मणभाई वाणी (शिक्षकेतर कर्मचारी श्रॉफ हायस्कूल, नंदुरबार), या सर्व गुणवंत व्यक्तींच्या कार्याची दखल घेत यापुढेही त्यांच्या हातून यशस्वी सेवाकार्य घडावं या हेतूने रोटरी क्लब ऑफ नंदनगरीच्या माध्यमातून या गुणवंत व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण ८ सप्टेंबर २०२१ बुधवार रोजी जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून अटल बिहारी वाजपेयी सभागृह न.पा.नंदुरबार येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व गुणवंतांना सन्मानित करण्यात येईल, असे रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष मनोज मोहन गायकवाड, सेक्रेटरी अनिल सोहनलाल शर्मा व लिटरसी चेअरमन इसरार सय्यद यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा परिसरात बिबट्याचा मुक्त संचार : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Next Post

मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीला शहीद शिरीषकुमार यांचे नाव देण्यात भाजपाची मागणी

Next Post
मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीला शहीद शिरीषकुमार यांचे नाव देण्यात भाजपाची मागणी

मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीला शहीद शिरीषकुमार यांचे नाव देण्यात भाजपाची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add