नंदुरबार l प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेच्या (शहरी) माध्यमातून प्रत्येक बेघर व्यक्तीला त्याच हक्काच घर मिळाले पाहीजे यासाठी खा.डॉ.हीना गावित यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे पंतप्रधान आवास योजना शहरी अंतर्गत केंद्र सरकारने नंदुरबार लोकसभा मतदार संघातील सर्व नगरपालिका क्षेत्रातील २ हजार ९१ घरकुलांच्या आराखड्याला मंजुरी दिली असल्याचे खा.डॉ.हीना गावित यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये सांगितले आहे.
नंदुरबार लोकसभा मतदार संघात शहरातील रहिवासी असणाऱ्या अनेकांना स्वत:च्या हक्काचे घर नाही.यामुळे खा.डॉ. हीना गावीत यांनी प्रत्येक नगरपालिकेतील शहरी भागातील गोर गरीबांना घरकुल मिळण्यासाठी पाठपुरावा केला.त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले. डॉ. हीना गावित या जिल्हा सनियंत्रण (दिशा समिती) समितीच्या अध्यक्ष या नात्याने त्यांनी मतदार संघात असलेल्या सर्व नगरपालिकेतील मुख्याधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. घरकुल मंजूर करण्यात आलेल्या आराखड्यामध्ये जे नागरिक सुटले असतील त्यांचे नव्याने अर्ज मागवून व त्यांना सदर आराखाड्यामध्ये समाविष्ठ करुन नविन आराखडा तयार करुन केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहे.
मी सर्व गोर-गरीब जनतेला पण आवाहन करते की जे लोक घरकुल योजनेतुन सुटले असतील त्यांनी या योजने अंतर्गत घरकुलासाठी अर्ज करावे. जसे आता केंद्र सरकारकडुन पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल मंजुर करुन आणले तसेच उर्वरीत घरकुल सुध्दा मंजुर करण्यात येतील. असे खा.डॉ.हीना गावित असे सांगितले.
मंजुर झालेल्या घरकुलांची नगरपालिकानिहाय संख्या
नंदुरबार नगरपालिकेतील पहिल्या टप्प्यात २५० व दुसऱ्या टप्प्यात १०५ घरकुले.
नवापुर नगरपालिकेतील पहिल्या टप्प्यात ३९ व दुसऱ्या टप्प्यात १०० घरकुले.
शहादा नगरपालिकेतील पहिल्या टप्प्यात १५० व दुसऱ्या टप्प्यात २५५ घरकुले
धडगांव नगरपंचायतमधील ३५० घरकुले
तळोदा नगरपालिकेतील ३०० घरकुले.
शिरपुर नगरपालिकेतील पहिल्या टप्प्यात १०० व दुसऱ्या टप्प्यात ४०० घरकुले.
साक्री नगरपालिकेतील ४२ घरकुले मंजूर करण्यात आले आहेत.