धडगांव पासुन पश्चिमेला अवघ्या १५ किलोमिटर अंतरावर असणार्या सातपुड्यातील दुर्गम भागात असनारे तीनसमाळ पर्यटकांना खुणावु लागले आहे. सातपुड्याच्या सात डोंगर रांगा अशाच प्रकारे निसर्गाची उधळण करत आहे.चला तर मग जाणुन घेवु सातपुडा पर्यटन एक शोधच्या माध्यमातुन तीनसमाळची सफर.
सध्या पावसाळा सुरु आहे,पाऊस म्हटले की समोर येते ते हिरवागार निसर्ग,डोंगरातून वाहणारे ओढे,खळाळून वाहणारे धबधबे. हे सर्व आठवताच आपण सुद्धा साहजिकच आकर्षित होतोच.यातच सध्या सातपुड्याच्या सात डोंगर रांगा अशाच प्रकारे निसर्गाची उधळण करत आहे. यातच सातपुडा मधील बारधार्या धबधबा व भूषा नर्मदा काठ पर्यटकांचे आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरत होता.पण ऑफ बीट पर्यटनाची आवड असणार्या युवा पिढीला तीनसमाळचे डोंगर खुणावत आहेत. गेल्या ३ वर्षा पासून व्हायरल होणार्या फोटो आणि विडीयो तसेच आपल्या सातपुडा पर्यटन एक शोध या टीम चे सहकार्य या माध्यमातून सातपुडा मधील तीनसमाळ ३ राज्याची सीमा असणारा जिल्ह्यात पोहचला आहे.
पावसाळ्यात येथील वातावरण व निसर्ग आघाडीच्या थंड हवेच्या ठिकाणाला सुद्धा लाजवेल एवढा सुंदर निसर्ग या ठिकाणचा आहे.पूर्वी या गावात पोहोचण्यासाठी रस्ता नसल्याने हे गाव बाहेरील जगापासून दुरावले गेले होते.पण आता पक्का रस्ता गावापर्यंत झाल्याने आता पावसाळ्यात हळूहळू पर्यटकांचे आकर्षनाचे केंद्रबिंदू ठरत आहे.या ठिकाणी असनारे एक साथ ४ उभे डोंगरांचे सुळके तीनसमाळ गावातून पाहताना आपण जणू काही स्वर्गात आलो आहे असे वाटते. या सुळक्यावर आदिवासी समाजाचे आतोनात प्रेम आहे.येथे दर वर्षी निसर्ग पूजा केली जाते.तसेच हे स्थळ जुने अस्तंभा शिखर म्हणून पूजनीय आहे.या ४ हि शिखरांना पूर्वी पासून वेग वेगळी नावे प्राप्त आहेत जसे आराह,मुराह,हूपडो ,इंदीलाराणी याप्रमाणे,सर्वात महत्वाचे म्हणजे येथील जैव विविधता संपूर्ण सातपुडा मधील दुर्मिळ जीव व वनस्पती या ठिकाणी आढळते.अनेक वन औषधी नी नटलेल हे तीनसमाळ चे जंगल आपणास डोंगराच्या कठड्यावरून अत्यंत सुंदर दिसते.३ वर्ष पूर्वी दुर्मिळ विषारी सर्प बांबू पिट वायपर चे फोटो येथील जंगलातूनच मिळाले होते .अजून उत्तम संशोधन झाल्यास नक्कीच दुर्मिळ वनस्पती व जीव चा शोध या ठिकाणाहून आपणास दिसेल.तसेच ३ राज्य एकत्र जोडणारा ठिकाण येथून समोरच नर्मदा नदीत आपणास दिसते.नर्मदा नदीचा अथांग पसरलेला सरदार सरोवर आपणास याची देही आयची डोळा आपणास बघण्यास मिळते. बिबट्या ,तरस,कोल्हा ,लांडगा ,मोर हे या जंगलात आढळून येतात. गेल्या महिन्यात जाण्याची संधी मिळाली तेव्हा लाल कलर चा सरडा या ठिकाणी दिसला. हे या ठीकानातील उत्तम जैव विविधतेचे उदाहरण होते पुढे थोडे जंगलात गेल्यावर मला त्याची खडकावर एक फौज मिळाली .खडक आणि त्यांचा कलर मिळता जुळता हीच तर निसर्गाची किमया आहे. या ठिकाणी खूप सारे सेल्फी पॉईंट आहेत पण सांभाळून खूप खोल दर्या सुद्धा आहेत.याच भागात फिरताना अनेक सृष्टी सोंदर्य आढळून आले अनेक ठिकाणी मनोसोक्त मस्त पैकी बसू वाटते यातच एक आणखीन सुंदर ठिकाण आढळून आले ते डोळ्याचे पारणे फेडणारे असेच होते.येथे लिहिण्यापेक्षा आपण स्वत जाऊन पहा म्हणजे तो काय फील असतो .तो आपनास सुद्धा मिळेल लिहून तो फील नाही येणार पण माझी एक विनंती आहे. की येथील निसर्गाला अजिबात धक्का लागू देऊ नका सोबत नेणारा कचरा सोबत आणावा जो आम्ही सुद्धा परत आणला ,माझ्या तर अंगणातून दिसंनारा तीनसमाळ आता खूप हवा हवासा वाटतो .यामुळच काय आता हा अनुभव प्रत्येकाला मिळावा म्हणून हा लेख लिहिण्याचा खाटाटोप करतोय.जेणेकरून सातपुडा चा पर्यटन वाढेल अनायासे येथील बांधवाना थोडासा का होईना रोजगार मिळेल. तीनसमाळ हे ठिकाण सातपुड्याच्या उच्च भागात वसलेले एक गाव आहे यामूळ या ठिकाणी फिरताना दरी च्या ठिकाणी सांभाळून नुसते साहस अजिबात न करता आपण पर्यटनाचा एकदम सुखद अनुभव घेऊ शकतो.एक उत्तम वाटाड्या केल्यास एक रात्र येथे घालवल्यास आपणास हे जंगल सुद्धा फिरता येईल नाहीतर तीनसमाळ गावातून सैर करून आपण एक दिवसाची ट्रीप या ठिकाणी नक्कीच होऊ शकते. सुंदर असणार्या या गावात आता शेतीमुळे सुद्धा एक वेगळच असे नैसर्गिक सोंदर्य लाभले आहे.आणि हे सोंदर्य आपण आपल्या डोळ्यांनी नक्कीच पाहावे.याचा प्रयत्न आमच्या सातपुडा पर्यटन एक शोध या टीमचा नक्कीच राहिला आहे. आता तो सहली आयोजित करण्याच्या माध्यामतून सुद्धा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.या ठिकाणी भेट द्यावी.
इंजि.प्रविण चिमा पावरा
सातपुडा पर्यटन एक शोध
फोन- ९४०५९६७५६६