Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर पोलिसांची पुन्हा दमदार कामगिरी, दिड लाखांच्या मुद्देमालासह दोघांना अटक

team by team
September 28, 2022
in क्राईम
0
नवापूर पोलिसांची पुन्हा दमदार कामगिरी, दिड लाखांच्या मुद्देमालासह दोघांना अटक
नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर येथील घरफोडीचा गुन्ह्यात 1 लाख 41 हजार 700 रुपये किमतीच्या मुद्देमालासह 2 संशयितांना नवापूर पोलीसांच्या ताब्यात घेतले आहे.
मागील काही दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत चोरी, घरफोडी चे गुन्हे दाखल असून ते गुन्हे अद्यापही उघडकीस आलेले नव्हते. त्याअनुषंगाने गुन्ह्यांचा गांभीने तपास करुन गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले.
 खलफान रहेमान शेख यांच्या मालकीचे नवापूर शहरातील लिलावती मॉलजवळ असलेल गोडावूनचे सिमेंटचे पत्रे तुटलेले दिसले व गोडावूनमधील A.C. 7 सिलिंग फैन  टेबल फॅन व पॉवर मशिन असा एकूण 41 हजार 760 रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याने खलफान रहेमान शेख रा. मुसलमान मोहल्ला, नवापूर यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 457,380, 34 प्रमाणे अज्ञात आरोपीतांविरुद् गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी नवापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांना गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत आदेशीत केले.
नवापूर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नवाहोंडा परीसरात,लकी बियरबार जवळ करंजी रोड लगत एका घराच्या आडोश्याला गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल नवापूर शहरातील सरदार चौक परिसरात राहणारा जुनंद काधावाला याने व त्याचे एका साथीदाराने लपवून ठेवलेला आहे त्यामुळे त्यांनी नवापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना सदर माहिती कळवून संशयीत आरोपी जुनेद काथावाला व त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेवून माहितीची खात्री करून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई कलेतने.नवापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदारांनी सरदार चौक परिसरात साध्या वेशात जावून सापळा रचून जुनेद कावावाला यास शिताफीने ताब्यात घेतले,  त्यास खलफान शेख यांचे गोडावून चोरी झालेल्या चोरीबाबत विचारपूस केली असता सुरवातीला तो उडवा उडवीचे उत्तरे देवू लागला नंतर त्यास नवापूर पोलीस ठाणे येथे आणून पुन्हा विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदार  सुभाष गायकवाड रा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, नवापूर याचे मदतीने केल्याची कबुली दिली.
तसेच सुभाष दगडू गायकवाड यास देखील ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील 41 हजार 760 रुपये किमतीचा मुद्देमाल व गुन्हा करतेवेळी वापरलेले मारुती व्हॅन वाहन असा एकूण 1 लाख 41 हजार 760 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. नवापूर पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी व अमलदार यांनी मालमत्तेविरुध्दचा गंभीर गुन्हा अवघ्या 24 तासात उघड करून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील यांनी नवापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे अभिनंदन केले.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, नंदुरबार विभागाचे उप विभागीय अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक निलेश वाघ, पोलीस हवालदार दादाभाई वाघ, पोलीस नाईका नितीन नाईक, पोलीस कॉन्सटेबल संदिप सोनवणे यांचे पथकाने केली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे अग्रसेन महाराज जयंती उत्साहात साजरी

Next Post

डी.आर.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय विज्ञान नाट्यमहोत्सव सहभाग

Next Post
डी.आर.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय विज्ञान नाट्यमहोत्सव सहभाग

डी.आर.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय विज्ञान नाट्यमहोत्सव सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026
नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

March 7, 2026
नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

March 7, 2026
महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

March 7, 2026
नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add