नंदुरबार l

तळोदा तालुक्यातील बोरद येथे ओट्यावर एकमेकांशी मस्करी करुन हसत असल्याचा राग आल्याने आई, मुलगी व मुलाला मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तळोदा तालुक्यातील बोरद येथील भुराबाई शांतीलाल माळी व त्यांची मुलगी व मुलगा घरासमोरील ओट्यावर एकमेकांशी मस्करी करुन हसून गप्पा करीत होते. याचा राग आल्याने सताबाई संजय नाईक यांनी भुराबाई शांतीलाल माळी यांना कपडे धुण्याच्या थापीने डोक्यावर मारुन दुखापत केली.
भूराबाई माळी यांची मुलगी व मुलगा यांनाही बिंद्राबाई गजानन नाईक, संजय गजानन नाईक यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. याबाबत भुराबाई माळी यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहेे. पुढील तपास पोना.विजय वसावे करीत आहेेत.









