नंदुरबार ! प्रतिनिधी-
शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था नाशिक या राष्ट्रीय उपक्रमशील संस्थेच्या वतीने उद्योगासह आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सामाजिक कृतज्ञता म्हणून देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कार नंदुरबारचे भूमिपुत्र तथा पुणे येथील उद्योजक मनोज देविदास मराठे यांना संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे आ.सुधीर तांबे यांच्या हस्ते देण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील रजाळे या छोट्याशा गावातून इंजि मनोज मराठे यांनी उद्योजक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी ते प्रत्यक्षात साकारले असुन ते आज पुणे येथे यशस्वी उद्योजक बनले असून त्यांनी अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार दिला आहे. कोरोना काळात अनेक कंपन्यांनी हजारो कामगार यांना बेरोजगार केले मात्र मनोज मराठे यांनी अनेक हातांना रोजगार दिला आहे. यामुळेच त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. लहानपणापासूनच शिक्षणाची आवड असलेले मनोज यांनी शिक्षण नंदुरबार येथे केले व पुढील शिकण पुणे येथे करून त्याच ठिकाणी इंजिनीयर म्हणून नोकरी करत त्यांनी स्वतःच उद्योग उभारलाय मनोज मराठे
नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथील रहिवासी तथा माजी मुख्याध्यापक देविदास लक्ष्मण मराठे व निर्मला देविदास मराठे यांचे सुपुत्र आहेत. मेकॅनिकल इंजिनियर असलेले मनोज यांनी पुण्यात उद्योगाची स्थापना करून समाजातील अनेक तरुणांपुढे आदर्श निर्माण केला आहे. बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर काम करून आलेला अनुभव उद्योग क्षेत्रात लावून अनेक तरुणांना रोजगार प्राप्त करून दिला व अधिक रोजगार देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही या सन्मानाच्या निमित्ताने मनोज यांनी जाहीर केली. यावेळी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की समाजात उद्योग क्षेत्रात मोठे काम करण्याचा मनोदय व्यक्त केला आणि आपल्या जन्मभूमी असलेल्या नंदुरबार तालुक्यातील रजाळे या गावी भविष्यात उद्योग उभारण्याचा विचार असल्याचे मत त्यांनी यावेळी मनोगत व्यक्त करतांना सांगितले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा दुर्गा तांबे उपस्थित होत्या.याप्रसंगी परिवारातील माजी मुख्याध्यापक देविदास मराठे, निर्मला मराठे, योगिता मराठे , सुभाष वाळे, नलिनी वाळे ,भानुदास चव्हाण , संदीप मोरे , ईश्वर बोऱ्हाडे उपस्थित होते. यावेळी मनोज मराठे यांनी जेष्ठ उद्योजक संतोष मराठे सर्व परिवाराचे संस्थेचे तसेच उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.