Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदिवासी विकास प्रकल्पतर्फे जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य रॅली उत्साहात

team by team
August 10, 2022
in राज्य
0
आदिवासी विकास प्रकल्पतर्फे जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य रॅली उत्साहात

नंदुरबार l प्रतिनिधी

जागतिक आदिवासी दिनानिमित्त तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबारच्यावतीने आज भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या रॅलीस जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील तसेच प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरवात करण्यात आली.

या भव्य रॅलीत शासकीय आदिवासी आश्रमशाळा व शासकीय वसतीगृहातील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी पारंपारीक आदिवासी वेशभुषा, ढोल, पावरी, शिबली, पावरा नृत्य अशा विविध पोशाखात लयबद्ध पद्धतीत सुंदर नृत्य यावेळी सादर करण्यात आले.

जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने रॅलीत ‘सुदृढ आरोग्य एकच ध्यास, कुपोषणाचा चुकवू फास’, ‘चला शिक्षण घेऊया, देश प्रगती पथावर नेऊ या’, ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’, ‘मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी! बालविवाह’, यासह कुपोषण, अमृत आहार, आरोग्य विषयावरील घोषवाक्य सादर करीत रॅलीस छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरापासून सुरु करण्यात येवून महाराणा प्रताप चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

या रॅलीत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील सहायक प्रकल्प अधिकारी एस. एन. काकडे, के. एस. मोरे, जीजा पाडवी, एम. एस. चौधरी, एस. एस. पटेल, सायराबानु हिप्परगे तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सुमारे 1 हजार विद्यार्थी व विद्यार्थीनी, नागरिक सहभागी झाले होते.

बातमी शेअर करा
Previous Post

आ.डॉ. विजयकुमार गावित यांच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर आरपीआय आठवले गटाच्या वतीने फटाके फोडून, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा

Next Post

मालवाहतुक गाडीची दुचाकीला धडक; युवकाचा जागीच मृत्यू

Next Post
आधार कार्डमुळे एकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

मालवाहतुक गाडीची दुचाकीला धडक; युवकाचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add