नंदूरबार l प्रतिनिधी
सुरतहून नंदुरबारकडे जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारचा टायर फुटल्याने मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अपघात झाला आहे.त्यामुळे कार चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट कठडे नसलेल्या पुलाचे लोखंडी खांब तोडून नदीत कोसळली. या अपघातात तीन पुरुष,दोन महिला,सहा महिन्याच्या बालक जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नंदुरबार येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुरतहून नंदुरबारकडे जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर ( क्र.जी.जे.०१, आर. ए.२९९४) या कारचे मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास तयार फुटल्याने कार चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट कठडे नसलेल्या पुलाचे लोखंडी खांब तोडून नदीत कोसळली.
अपघात होतात पोलीस व स्थानिकांनी
जखमींना कारमधून बाहेर काढले व रुग्णालयात नेले. या अपघातात रमेश पाटील, कल्पेश देवरे, अश्विनी देवरे,अशोक पाटील, निलिमा पाटील व सहा महिन्यांचा बालक. सर्व रा. जगताप वाडी, नंदूरबार, जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नंदुरबार येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी पुढील तपास विसरवाडी पोलिस करीत आहे.