Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा तालुक्यातील सोमावल बु. येथे आरोग्य वर्धिनी केंद्राचे उद्घाटन

team by team
August 15, 2021
in आरोग्य
0
तळोदा तालुक्यातील सोमावल बु. येथे आरोग्य वर्धिनी केंद्राचे उद्घाटन

नंदुरबार ! प्रतिनिधी

राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा‍ जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते तळोदा तालुक्यातील सोमावल बु. येथे उभारण्यात आलेल्या आरोग्य वर्धिनी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहायक जिल्हाधिकारी मैनक घोष, माजी मंत्री पद्माकर वळवी, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, तहसिलदार गिरीष वखारे, पंचायत समिती उपसभापती लता वळवी, जि.प.सदस्य सुहास नाईक, जान्या पाडवी, दिलीप नाईक आदी उपस्थित होते.
ॲड.पाडवी म्हणाले, सोमावल लगत 50 गावे जोडलेली असल्याने परिसरातील नागरिकांना याचा चांगला लाभ होईल. प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर ग्रामीण रुग्णालयात  झाल्यास चांगल्या आरोग्य सुविधा देता यतील. जागा उपलब्ध करून दिल्यास केंद्राचे रुपांतर ग्रामीण रुग्णालयात करण्यासाठीद प्रयत्न करता येईल. आरोग्यवर्धिनी केंद्रातील रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. परिसरातील पयाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागात आरोग्य विषयक जनजागृती करण्याची गरज असल्याचे सांगून कोविडचे संकट अद्यापही पूर्णपणे गेले नसल्याने नागरिकांनी शासनाच्या मार्गदर्शन सुचनांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने नागरिकांना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात येतील, असेही ॲड.पाडवी म्हणाले.
यावेळी जि.प.अध्यक्षा ॲड.वळवी, आमदार श्री. पाडवी, जिल्हाधिकारी श्रीमती खत्री आणि श्री.गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत हे केंद्र तयार करण्यात आले असून त्यासाठी 1 कोटी 85 लक्ष रुपये खर्च करण्यात आला आहे, अशी माहिती डॉ.बोडके यांनी दिली.
बातमी शेअर करा
Previous Post

पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

Next Post

आरटीओ बच्छाव यांनी आज पदभार सोडला,किरण बिडकर लवकरच स्वीकारणार पदभार

Next Post
आरटीओ बच्छाव यांनी आज पदभार सोडला,किरण बिडकर लवकरच स्वीकारणार पदभार

आरटीओ बच्छाव यांनी आज पदभार सोडला,किरण बिडकर लवकरच स्वीकारणार पदभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add