देशातील व राज्यातील वाढत जाणाऱ्या कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येवर नियंत्रण आणण्याकरिता व कोवीड – १ ९ चा संसर्ग पसरु नये यासाठी महाराष्ट्र शासनाने मोहरम सण कशा प्रकारे साजरा करावा याबाबत परिपत्रकाद्वारे सूचना दिलेल्या आहेत . सदर परिपत्रकान्वये मोहरम सणाच्या कालावधीत निघणाऱ्या मिरवणुकांवर बंदी घातली आहे . या अनुषंगाने हजरत सैय्यद अलाऊद्दीन ( इमाम बादशाह रहे ) अध्यक्ष समीउल्लाह मियाँ अब्दुल मियाँ जहागिरदार यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्र देऊन कळविले आहे की , कोविड -१ ९ या विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचे संकट लक्षात घेवुन जिल्हावासियांचे आरोग्याच्या दृष्टीने आणि हिताच्या दृष्टीने सालाबाप्रमाणे ” हजरत सैय्यद अलाऊद्दीन ( इमाम बादशाह रहे ) ” यांचा भरणारा उरुस मागील वर्षी प्रमाणे यंदाही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे . परंतु चालू वर्षी कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या परिपत्रकान्वये मोहरम सण साजरा करण्याच्या ज्या सूचना प्राप्त झाल्या आहेत , त्यानुसार मोहरम निमित्त हजरत पीर सैय्यद अलाउद्दिन ( इमाम बादशाह रहे . ) यांचा भरणारा उरुस रद्द करण्यात आला आहे . ” हजरत सैय्यद अलाऊद्दीन ( ऊर्फ ) इमाम बादशाह ( रहे )