नंदूरबार l प्रतिनिधी
“फेडरेशन ऑफ इंडियन इंडिजिनस लँग्वेजेस”तर्फे ‘राष्ट्रीय कार्यक्रम’ टाटानगर येथील आदिवासी क्लचर सेंटर झारखंड येथे कार्यक्रम संपन्न झाला.
यात देशभरातील विविध आदिवासी भाषांमध्ये लेखन करणारे कवी, साहित्यिक, भाषा कार्यकर्ते आणि अभ्यासक सहभागी झाले होते. भाषा चळवळीशी संबंधित देशाच्या कानाकोपऱ्यातील विविध आदिवासी भाषा संघटना यात सहभागी झाल्या होत्या.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक वाहरू सोनवणे (भिलोरी भाषा), युवा कवी संतोष पावरा (पावरी भाषा) कुसुम आलम (गडचिरिली) आणि भाषा कार्यकर्ते योगेश मगरे उपस्थित होते. या कार्यक्रमात त्रिपुराहून आलेले विशेष प्रमुख पाहुणे विकास राय देवबरमा, मार्गदर्शक डॉ. वासवी किडो, साहित्य दिल्ली में संथाली भाषा प्रमुख मदन मोहन सोरेन, बाबा मांझी, रवींद्रनाथ मूर्मु, देमका सोय, स् स्टीमलेट दकार ,सिदेश्र्वर जी हो भाषा साहित्य डोबरो बिरुल, बाबा मांझी, देमका सोय आदी मान्यवरांची भाषणे झाली.
आदिवासी भाषा युनो आणि संविधानापूर्वीची आहे, ती वाचवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. आदिवासी भाषा जिवंत राहील तरच आदिवासींचे ज्ञान जिवंत राहील, आदिवासींचे अस्तित्व, अस्मिता जिवंत राहील, त्यामुळे सरकारने भाषा संवर्धनाचे विशेष काम करावे, युनेस्कोने जाहीर केलेल्या आदिवासी भाषा उत्सव वर्षासाठी शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. , नाहीतर देशभरातील आदिवासी, त्यांच्या भाषेच्या विविध संघटना मिळून आदिवासी भाषा जतन संवर्धन साठी उलगुलान करणार असा इशारा यावेळी देण्यात आला.
आशिया खंडात युनेस्कोने आदिवासी भाषेच्या कामासाठी दिल्ली येथील प्रोफेसर बेंजामिन बारा यांची नियुक्ती केली आहे. पण बेंजामिन बारा यांना आदिवासी भाषेबद्दल काहीच माहीत नाही, भाषेसाठी त्यांचे कामही नाही. डॉ बारा हे बिझनेस टीचिंगचे प्राध्यापक आहेत. त्यामुळे त्यांना या पदावरून हटवून भाषेवर काम करणाऱ्या आदिवासी कार्यकर्त्यांची नियुक्ती करा, अशा मागणीची घोषणा या सभेतून करण्यात आली. आणि उपस्थित सर्वांनी या घोषणेचे समर्थन केले.