नंदूरबार l प्रतिनिधी
संसदरत्न खा. डॉ. हिना विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा 2022 आयोजित करण्यात आली होती. यात सुमारे सहाशे ते सातशे खेळाडूंनी सहभाग नोंदविला. मॅरेथॉन स्पर्धेस खा. डॉ. हिनागावित यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुप्रिया गावित, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र माळी, प्रा ईश्वर धामणे, नगरसेवक संतोष वसईकर, शहर भाजप शिक्षक आघाडी शहर अध्यक्ष जितेंद्र पगारे, युवराज भांबरे आदी उपस्थित होते.
लहान गटात मुलींसाठी 4 किमी व मुलांसाठी मोठ्या गटात महिलांसाठी 6 किमी तर पुरुषांसाठी 10 किमी अंतर होते.
सदर स्पर्धेसाठी सर्व गटात प्रथम येणाऱ्या खेळाडूस रुपये 5 हजार रोख सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय येणाऱ्या खेळाडूस रोख तीन हजार रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय येणाऱ्या खेळाडूस दोन हजार रुपये रोख सन्मानपत्र सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र,
चतुर्थ येणाऱ्या खेळाडूस पंधराशे रुपये रोख सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, पंचम येणाऱ्या खेळाडूस हजार रुपये रोख सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच षष्ठम येणाऱ्या खेळाडूस पाचशे रुपये रोख व प्रमाणपत्र खा. डॉ.हिना गावित, आ. डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
खुला गट पुरुष: 1) वळवी भगतसिंग रामसिंग , 2) वसावा इनेस पाच्याभाई , 3) वसावे दिनेश सजण, 4)पावरा लयसिंग हूनजी , 5)वसावे रविंद्र टेटगा
6)आंबेकर विकी केदा
महिला : 1) पावरा आरती अर्जुन , 2) वसावे महेक मंगलदास, 3) काटोले अश्विनी नामदेव, 4) बैसाने निकिता दिलीप, 5) पावरा बायजा कुवरश्या
6) वळवि सुनीता मोचडा
लहान गट (सहावी ते दहावी) : मुले 1) राठोड बिभीषण कपूरचंद, 2) राठोड श्रावण राजु, 3) वसावे निलेश रमेश , 4) वसावे कुलदीप मंगलदास, 5) कोळी सिद्धांत रविंद्र , 6) पाडवी चेतन गणपत
लहान गट(सहावी ते दहावी) मुली : 1) वसावे शकीला बाश्या, 2) पाडवी सोनाली गणपत, 3) वळवी योगिता संजय, 4) पाडवी अंजली दारासिंग, 5)रोझोदे जान्हवी संजय, 6) गावीत सुहानी छगन यांनी यश संपादित केले.
पंच म्हणुन भागूराव जाधव, राजेश शहा, मीनल वळवी, निलेश गावित, दिनेश सुर्यवंशी , शांताराम पाटील ,महेश भट ,मधूकमल हिवाळे ,जगदीश वंजारी, अनिल रोंद्ल ,जगदीश बच्छाव , नितीन कबाडे, किसन पावरा, रवींद्र सोनवणे आदींनी काम पाहिले तसेच स्पर्धा यशस्वीतेसाठी जितेंद्र माळी, राजेश्वर चौधरी, मनीष सनेर, योगेश माळी, भुषण माळी, रोहित माळी, अमोल चित्ते, आकाश बागुल आदींनी परिश्रम घेतले.
सर्व सहभागी विद्यार्थिनींना यावेळी प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेन्द्र पगारे यांनी तर आभार प्रा. डॉ.ईश्वर धामणे यांनी मानले.