Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दोन वर्षाच्या खंडानंतर उमर्दे खुर्द येथे श्री.खंडेराव महाराज यांच्या यात्रेनिमित्त बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होणार

team by team
April 20, 2023
in राज्य
0
दोन वर्षाच्या खंडानंतर उमर्दे खुर्द येथे श्री.खंडेराव महाराज यांच्या यात्रेनिमित्त बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होणार

नंदूरबार l प्रतिनिधी
उमर्दे खुर्द ता. नंदुरबार येथील श्री खंडेराव महाराज यांची दोन वर्षापासून बंद असलेली यात्रा यावर्षी यात्रा भरणार असून बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम ही होणार आहे.
मागील दोन वर्षापासून कोविड प्रादुर्भावामुळे दोन वर्षापासून यात्रा बंद होती. यावर्षी यात्रा भरण्याचा ग्रामस्थांतर्फे निर्णय घेण्यात आला. 2 मे व 3 मे 2022 रोजी खंडेराव महाराजांची यात्रा भरण्याचे आयोजन ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे. 2 मे रोजी सायंकाळी पाच वाजता ज्या जागेवर बारा गाडी ओढण्यास सुरुवात होते, त्या जागेवर वाजत-गाजत सुहासिनीद्वारे पाण्याचा सडा टाकला जातो.
3 मे मंगळवार रोजी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पाचवी पिढीतील श्रीखंडेराव महाराजांचे सेवेकरी जितेंद्र मराठे बारा गाडी ओढणार आहेत. पाच वर्षापासून जितेंद्र मराठे हेच यात्रेत बारा गाड्या ओढत आहेत.
जितेंद्र मराठे यांचे खापर पंजोबा श्री खंडेरावाचे सेवकरी लकडू मराठे हे आईचा आहे आईचाळे ता. साक्री इथून उमर्दे खुर्द येथे वास्तव्यास आले त्यांनी बारा गाडी ओढण्याच्या कार्यक्रमास सुरुवात केली. उमर्दे येथे खंडेरावाची स्थापना केली तेव्हापासून अखंडपणे अक्षय तृतीया खंडेरावाची यात्रा भरते.१९९५ श्री. खंडेराव महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.श्री.खंडेराव महाराज माळसाबाई व बानुबाई यांची मूर्ती स्थापना करण्यात आली. बारा गाड्या ओढण्याचा जातात.लकडू मराठे नंतर त्यांचा मुलगा दगा लकडू मराठे , गोकुळ दगा मराठे, सुदाम गोकुळ मराठे आता पाचव्या पिढीतील श्री. खंडेराव महाराजांचे सेवेकरी जितेंद्र सुदाम मराठे यात्रेत बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम करतात.
अक्षय तृतीय सायंकाळी पाच वाजेपासून बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रमास सुरुवात होते.वाघ्या मुरळी या भोप्प्या यांच्यासोबत वाजत गाजत श्री. खंडेरावाचे सेवेकरी पानझोक व मोर पिच्छा घेऊन बारा गाड्यांना पाच प्रदक्षिणा घालतात. बारागाडी होण्यापूर्वी साकळ(नांगरटीची) तोडली जाते. त्या नंतर बारा गाड्या ओढल्या जातात. बारा गाड्या गावातून गोळा केल्या जातात सुरुवातीला तगतराव नंतर बारागाड्या ची रचना केली जाते.हा कार्यक्रम पाहण्यासाठी नंदुरबार सह परिसरातील धामडोद, दहिंदुले भालेर, नगाव, तिशी ,अक्राळे, वावद ,खोंडामळी विखरण शिंदगव्हान, काकर्दे आधी गावातील भाविक खंडेरावाच्या दर्शनासाठी व कार्य बारा गाडी ओढण्याच्या कार्यक्रम पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होते. यात्रेत लहान मुलाच्या मनोरंजनासाठी पाळणे व पालख्या दाखल झाल्या असून यात्रेत हलवाई व थंड पेयाची दुकाने थाटली जातात. ग्रामस्थाच्या मनोरंजनासाठी ग्रामस्थांतर्फे तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन वर्षानंतर यावर्षी श्री खंडेराव महाराजांची यात्रा भरत असल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रीया सुरू

Next Post

सिनियर राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक, विजयी खेळाडूंचा चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add