नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील विखरण येथील श्री.आपासो.आ.ध.देवरे विद्यालयात आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध उपाययोजनांचे निरीक्षण व वृक्षारोपण सोहळा उत्साहात पार पडला.
श्री.आप्पासाो.आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण ता.जि.नंदुरबार विद्यालयात नंदुरबार जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी एम.व्ही. कदम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार विभागाचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व्ही.व्ही.बोरसे,नवनिर्माण संस्था नंदुरबार संस्थेचे,अध्यक्ष रवी गोसावी, जी.टी.पाटील महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.माधव कदम हे मान्यवर उपस्थित होते. अतिथींचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांनी पुस्तक भेट देऊन केले. प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातील प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम यांनी 10 वी वर्गात अध्यापन करून विद्यार्थ्यांना कोरोना काळातील अभ्यासाचे नियोजन, पुढील भावी जीवनात स्पर्धा परीक्षा,व्यवसायिक शिक्षण,करियर विषयी मार्गदर्शन केले.शिक्षणाधिकारी यांनी “गुणवत्ता वाढीची पंचसूत्री” कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी केली.
प्रमुख अतिथींनी विद्यालयात आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजनांचे निरीक्षण केले.यात भिंतीवरील सुरक्षित स्थळ दर्शक नकाशा,आपतकालीन दूरध्वनी क्रमांकाची यादी,प्रथमोपचार पेटीतील साहित्य,सर्पदंश झाल्यावर प्रथमोपचार कसा करावा?,अग्नी विझवण्यासाठी वाळूच्या बादल्या यांची पाहणी केली. टेकडी जवळील शाळा परिसरातील बांबू लागवडीचे निरिक्षण केले. इतर सूचना फलकांची पहाणी केले.विद्यालयात आपत्ती आल्यावर सुरक्षित स्थळी पोहोचण्यासाठी मॉकड्रीलचा सराव मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला.अग्निशमन यंत्राचा उपयोग करून आग विझवण्यात आली.या प्रात्यक्षिकाने विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले.
शिक्षणाधिकारी ( माध्य.) जि.प. नंदुरबार कार्यालयाला,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय,नंदुरबार यांना तसेच श्री.देवरे माध्य.विद्यालय विखरण विद्यालयाला नवनिर्माण संस्था नंदुरबार संस्थेच्या वतीने रवी गोसावी यांनी “स्वच्छता किट” सप्रेम भेट दिल्यात.मान्यवरांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व्ही.व्ही.बोरसे यांनी सांगितले की,आपल्यावर एखादी आपत्ती आली तर त्या काळात आपण व आपल्या प्रियजनांची कशा प्रकारे खबरदारी घ्याल ? व उपाययोजना विषयी मार्गदर्शन केले.नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष, रवी गोसावी यांनी विद्यार्थ्यांनी भावी जीवनात स्पर्धापरीक्षेची तयारी करून सामोरे जावे. व शालेय वातावरणाचा लाभ घेऊन यशस्वी होण्याचे आवाहन केले. प्रा.डॉ.माधव कदम यांनी निसर्गरम्य शाळेतील आनंद विद्यार्थ्यांनी घ्यावा. शालेय विविध उपक्रमांतून ज्ञान घेऊन आपल्या यशस्वी जीवनाची सुरुवात विद्यालयातून करावी,असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.आपल्या अध्यक्षीय मनोगतात शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम यांनी कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्त्व विशद करताना एक झाड 18 व्यक्तींना ऑक्सिजन पुरवतो.म्हणून आपल्या परिसरात,शेताच्या बांधावर,शाळेत ऑक्सिजन निर्माण करणारी वृक्ष जगवण्याचे आवाहन केले.आपत्ती आपल्या दैनंदिन कामकाज करतांना येऊ शकते.त्याला सुनियोजनाने सामोरे जाणे गरजेचे आहे. हे विषद केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.बी.भारती यांनी केले.तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी के.पी.देवरे, एम.डी.नेरकर, वाय.डी.बागूल,व्ही.बी. अहिरे,आर.एम.पाटील,एस. जी.पाटील,श्रीम.एम.आर.भामरे यांनी परिश्रम घेतले.