Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धांद्रे बु. येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन

team by team
August 4, 2021
in राजकीय
0

नंदुरबार ! प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील मौजे धांद्रे बु. येथील ग्रामपंचायतीचे सरपंच शिवदास ज्योतेसिंग चित्ते यांचे विरुद्ध दाखल झालेल्या तसेच 20 डिसेंबर 2019 रोजी तीन चतुर्थश मताने मंजूर झालेल्या अविश्वास प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये उपविभागीय अधिकारी शहादा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धांद्रे ब्रु. येथे 6 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 9 वाजता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
विशेष ग्रामसभा घेणेकरीता प्रचलित नियमान्वये सभेची गणपुर्ती आवश्यक राहील. आवश्यकता असल्यास सभेच्या दिवशी अविश्वास ठराव संमत करणेकामी गुप्त मतदान घेण्यात येईल. यासाठी 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरुन 31 ऑगस्ट 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली मतदार यादी ग्राह्य धरण्यात येईल. या दिवशी विशेष ग्रामसभेत फक्त अविश्वास ठरावावर चर्चा होईल इतर विषयांवर चर्चा होणार नाही.
विशेष ग्रामसभेत उपस्थित राहून मतदान केलेल्या सदस्यांच्या साध्या बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाला असेल तर सदरचा अविश्वास ठराव संमत झाला आहे असे समजण्यात येईल. विशेष ग्रामसभेमध्ये उपस्थित राहून मतदान केलेल्या सदस्यांच्या साध्या बहुमताने अविश्वास फेटाळला असेल तर सरपंच पद कायम राहील.
विशेष ग्रामसभेत कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन तसेच सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असेल. ग्रामसभेमध्ये येतांना ग्रामपंचायतीच्या मतदारांनी सोबत राज्य निवडणूक आयोगाने विहीत केलेल्यापैकी कोणताही ओळखीचा पुरावा सोबत बाळगणे आवश्यक राहील असे उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी कळविले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

धुळीपाडा येथे जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त महिलांना मार्गदर्शन

Next Post

स्पर्धा परीक्षेकरिता प्रशिक्षणाचे आयोजन

Next Post

स्पर्धा परीक्षेकरिता प्रशिक्षणाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add