मोलगी ! प्रतिनिधी
मोलगी परिसरात मागील दोन महिन्या पासून वीज पुरवठा वारंवार खंडित असून मागील सात दिवसा पासून मोलगी परिसरात लाईट नाही त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.लाईट नसल्याने बँकांचे व्यवहार ठप्प आहेत .
मोलगी परिसरातील वीज पुरवठा नेहमी खंडित असून वीज बिल मात्र दर महिन्याला दोन ते तीन हजारा पर्यंत येत असल्याने नागरिक हैराण झाले आहे.मोलगी येथे पूर्ण परिसरासाठी 33 kv चे एकच सबस्टेशन असल्याने पूर्ण परिसर यावर अवलंबून आहे . त्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा नेहमी खंडित असतो.बऱ्याच वर्षा पासून सुरू असलेले सुरवाणी येथील १३३kv चे वीज वितरण उपकेंद्राचे काम अजूनही अपूर्णच असल्याने या सर्व समस्याना सामोरे जावे लागत आहे.या उपकेंद्रास मागील शासन काळातील ऊर्जा मंत्री यांची भेट , महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांच्या भगदरी दौऱ्याच्या वेळेस ही ही समस्या मांडण्यात आली , तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , यांनी या विद्युत उप केंद्राला भेट देऊन कामाची पाहणी करून उप केंद्र लवकरच पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले होते . तोच दुजोरा नंदुरबार जिल्ह्याचे पालक मंत्री ॲड.के.सी.पाडवी नंदुरबार यांनी ही दिला होता.परंतु हे काम अपूर्णच असल्याने ह्या समस्या निर्माण होत असल्याचे सांगण्यात येत आहे.मोलगी परिसरात मागील दोन महिन्या पासून वीज पुरवठा वारंवार खंडित असून मागील सात दिवसा पासून मोलगी परिसरात लाईट नाही त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.लाईट नसल्याने बँकांचे व्यवहार ठप्प आहेत .टॉवरची रेंज नाही.ऑनलाईन शिक्षण बंद झाले आहे.पोल्ट्री सारख्या व्यवसायाला लाईट नसल्याने मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.पूर्वी घरात चिमनी ( दिवा ) पेटवायला रॉकेल भेटायचे पण तेही आता बंद असल्याने घरातील दिवा सुद्धा पेटत नाही अशी अवस्था मोलगी परिसरातील लोकांची झालेली आहे . मोलगी परिसर हा नंदुरबार जिह्यातील उत्तर भाग असून तालुका लेव्हलचा खूप मोठा भाग आहे.म्हणून प्रशासनाने व नंदुरबार जिल्ह्यातील सन्मानीय लोक प्रतिनिधींनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊनपूर्ण तालुक्यातील अंधार दूर करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे . या भागातील लोकांसाठी भौतिक सुविधांचा नेहमी बोलबाला असतो आता नर्मदेच्या काठा पर्यंत लाईटच्या तारा पोहचल्या पण त्यात अजून विद्युतप्रवाह आलेला नाही.ही वस्तुस्थिती आहे.अजून किती दिवस अशा प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.