तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील बोरद वनविभागाचा कार्यक्षेत्रातील रावलापाणी कूप मध्ये लागलेल्या आग मुळे काही झाडांना झळ पोहचली मात्र सुदैवाने रावलापाणीच्या रतीलाल पावरा या युवकाने धाडसाने आग विझवून नियंत्रण मिळविले पुढील होणारी वन संपदा वाचविण्यात यश आले. युवकाने केलेल्या धाडसाचे सोशल मीडिया व सर्वत्र कौतुक होत आहे.
वनविभागाच्या बोरद बिटमधील रावलापाणी परिसरातील कुप नं 471 मध्ये अज्ञात इसमाने आग लावून दिली होती. त्यामुळे झाडे तसेच वनसंपदा काही ठिकाणी झ पोहचली आहे आग लागलेली पाहून रावलापाणी येथील रतीलाल पावरा हे सकाळी 9 वाजता शेतात गेले असता धुर दिसला. ते तत्काळ घटनास्थळी पोहोचलो असता खूप मोठ्या प्रमाणात आग पसरली होती. रतीलाल पावरा या युवकाने स्वतः आग विजविण्यास सुरवात केली. पाला पाचोळा दूर करत करत पट्टे तयार करून सतत 2 ते 3 तास संघर्ष करीत एकट्याने संपूर्ण आग विजविण्यात यश आले आहे. आता पूर्ण पणे आग विजवली आहे. रावलापाणीचे रतिलाल पावरा यांनी आग विझवीत वनविभागाच्या हद्दीतील वनसंपदा जळून पुढील होणारी हानी टाळली आहे. आहे या युवकाने केलेलं धाडसी योगदानाचे सोशल मीडियावर या कामाचा प्रशंसा होते कौतुक करीत आहे.








