नंदुरबार l प्रतिनिधी
कोरोना कालावधीत मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या वारसांना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. पालिकेकडून १२७ कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.नंदुरबार जिल्ह्यातील सहा कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाभ होणार आहे, अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रणजितसिंग राजपूत यांनी दिली. त्यांनी कोविड – १९ मुळे मृत्युमुखी पडलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाखांचे सानुग्रह अनुदान देण्याचे घोषित केले.
राज्यातील अ व ब वर्ग महानगरपालिका वगळता इतर महापालिका व नगरपालिका क्षेत्रातील कोविड विरोधी मोहिमेमध्ये कर्तव्य पार पाडताना कोरोनाची
लागण होऊन मृत्युमुखी पडलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सानुग्रह सहाय्य अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार राज्यातील पालिकेच्या १२७ कर्मचाऱ्यांच्या वारसांना थेट ५० लाखांचे विमासुरक्षा कवच देण्यात येत आहे. अनुदान बँक खात्यावर जमा होईल. सर्वाधिक ४३ योद्धे नाशिक विभागात असून नागपूरला १५, अमरावती १२, कोकण १४, पुणे २२, औरंगाबाद १८ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सहा लाभार्थी आहेत. मध्यवर्ती महासंघाने शासन व नगरपरिषद संचालनालयाचे संचालक तथा आयुक्त डॉ. किरण
कुलकर्णी यांनी विशेष सहकार्य केले. तसेच राज्यातील कोरोना योद्ध्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यासंदर्भातील आदेश लवकरच पारित करण्यात येतील, असे श्री. राजपूत यांनी सांगितले. मध्यवर्ती महासंघाने केलेल्या पाठपुराव्याला यश येत आहे
या प्रस्तावाबाबत नगर विकास विभाग, विभागीय आयुक्त, पालिका संचालनालय, जिल्हा सहआयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी स्तरावर सुमारे वर्षापासून पाठपुरावा करण्यात येत होता. कोरोनामुळे घरातील कर्त्या माणसाचा मृत्यू झाल्यामुळे सुमारे दीड वर्षापासून विमा कवच, अनुकंपा नोकरी, निवृत्ती उपदानाबाबत सातत्याने लक्ष लागून होते. उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.








