Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २१ लाखाचा धनादेश सुपूर्द

team by team
July 26, 2021
in सामाजिक
0
माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २१ लाखाचा धनादेश सुपूर्द
नंदुरबार ! प्रतिनिधी
समाजाशी नाळ जोडलेल्या नंदुरबार तालुका विधायक समिती परिवाराकडून सामाजिक बांधिलकी जोपासत शिवसेनाप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पुरग्रस्तांना २१ लाखाच्या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात आला आहे. शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना धनादेश सुपूर्द करण्यात आला.
गेल्या आठवड्यापासून पश्चिम महाराष्ट्रात पुराणे अक्षरशः थैमान घातले आहे. कोल्हापूर,सातारा, सांगली,रायगड जिल्ह्यासह महापूर आल्याने नागरिकांचे संसार उध्वस्त झाले. अनेक ठिकाणी दरडी कोसळून शेकडोवर निष्पाप नागरिकांच्या जीव गेला. शासन प्रशासनाच्या माध्यमातून उपाय योजना करण्यात येत आहेत. परंतु, आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून नंदुरबार तालुका विधायक समिती कोणत्या परिवाराकडून पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे ठरविण्यात आले.
 शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन मनोज रघुवंशी यांच्या पुढाकारातून संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला २१ लाख रुपयांच्या धनादेश देण्यात आला. मदतीचा धनादेश माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन मनोज रघुवंशी,नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ॲड  राम रघुवंशी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना सुपूर्द करण्यात आला.
यावेळी नगरसेवक कुणाल वसावे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील उपस्थित होते.
राज्यावर पूर परिस्थितीचे अत्यंत भीषण संकट आहे. संकटाच्या वेळी शासन-प्रशासन धावूनच येईल परंतु आपलीही सामाजिक जबाबदारी आहे मदत करण्याची. पुरात शेकडो नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. दुर्देवाने अनेकांचे मृतदेह हाती लागलेले नाहीत. ज्या-ज्या वेळी संकटे येत असतात त्यात्या वेळी रघुवंशी परिवार व नंदुरबार तालुका विधायक समिती जनतेच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जोपासून शिवसेना प्रमुख,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवस निमित्त नंदुरबार तालुका समितीच्या शैक्षणिक संस्थेतील कर्मचार्‍यांना पूरग्रस्तांसाठी मदतीची विनंती केली होती. त्यानुसार २१ लाखाचा धनादेश पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आला आहे.असे 
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले
बातमी शेअर करा
Previous Post

रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरु ठेवल्याप्रकरणी १३ जणांविरुद्ध गुन्हा

Next Post

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नंदुरबार जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे ५१ हजाराची मदत

Next Post
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नंदुरबार जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे ५१ हजाराची मदत

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नंदुरबार जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे ५१ हजाराची मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली  सुरुवात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली सुरुवात

August 26, 2026
प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add