# Public Mirror News > Latest Marathi News ## Posts - [तोरणमाळ महोत्सव 2026 : आदिवासी संस्कृती, पर्यटन व रोजगारनिर्मितीचा संगम,आदिवासी संस्कृती, पर्यटन व रोजगारनिर्मितीला नवी दिशा](https://publicmirrornews.com/45882/): नंदुरबार | प्रतिनिधी तोरणमाळ या निसर्गसंपन्न पर्यटनस्थळी पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी तोरणमाळ महोत्सवाच्या आयोजनाबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक आज पार पडली. या बैठकीत तीन दिवसीय तोरणमाळ महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा महोत्सव दिनांक 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून तोरणमाळची नैसर्गिक संपदा, आदिवासी संस्कृती आणि स्थानिक उपजीविकेचे दर्शन घडविण्यात येणार आहे. महोत्सवात आदिवासी संस्कृतीचे सादरीकरण व प्रदर्शन, पारंपरिक नृत्य, कला, हस्तकला तसेच लोकजीवनाची ओळख करून देण्यात येणार आहे. यासोबतच पर्यटकांसाठी तोरणमाळ परिसरातील प्रमुख पर्यटन स्थळांचे भ्रमण आयोजित करण्यात येणार आहे. पर्यटनाला अधिक आकर्षक स्वरूप देण्यासाठी साहसी पर्यटन उपक्रमांतर्गत झिप […] - [एस.ए. मिशनमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त अभिवादन व सांस्कृतिक कार्यक्रम](https://publicmirrornews.com/45876/): नंदुरबार l प्रतिनिधी- एस.ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे स्त्री शिक्षणाच्या जननी आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, काव्यवाचन आणि प्रबोधनात्मक एकांकिकेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला सावित्रीबाई फुले यांची एकपात्री भूमिका सादर करणाऱ्या श्रीमती नूतन नांद्रे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षां वळवी,उपप्राचार्य विजय पवार,पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक मीनल वळवी, सी.पी बोरसे आदी उपस्थित होते.ह्यात विद्यार्थिनींनी अत्यंत उत्साहाने आपला सहभाग नोंदवला. कार्यक्रमात श्रीमती नूतन पाटील यांनी ‘मी सावित्री बोलतेय’ हा प्रभावी एकपात्री […] - [राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त माजी खा.डॉ. हिना गावित यांनी केली अभिवादन](https://publicmirrornews.com/45873/): नंदुरबार l प्रतिनिधी- शिक्षणाची जननी राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या १९५व्या जयंतीनिमित्त भाजपाच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी नंदुरबार येथील माळीवाडा परिसरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.   आमच्यासारख्या लाखो-कोटी स्त्रियांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळवून देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती असून, त्यांच्या महान कार्याची आठवण या निमित्ताने होत आहे. गोरगरीब, वंचित, पीडित आणि महिलांसाठी राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. अत्यंत बिकट सामाजिक परिस्थितीत, स्त्रीशिक्षणाला तीव्र विरोध असतानाही सावित्रीबाई फुले यांनी हार न मानता महिलांना शिक्षण देत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्या काळातील त्यांच्या संघर्षाची खरी किंमत आज […] - [आ.चंद्रकांत रघुवंशींच्या नगरसेवकांना कामाला लागण्याच्या सूचना,शहरातील प्रभाग १ मध्ये रस्ते विकास कामाचे भूमिपूजन](https://publicmirrornews.com/45870/): नंदुरबार l प्रतिनिधी निवडणूक संपताच नगरपरिषदेचे नगरसेवक आता कामाला लागलेले आहेत. शहरातील प्रभाग क्र.१ मध्ये कोट्यवधींच्या रस्ते विकास कामांना सुरुवात झाली असून, त्याचे भूमिपूजन नगरसेवक किरण रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी नगरसेवकांना कामाला लागण्याच्या सूचना केले आहेत. गेल्या २ महिन्यापासून नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू असल्यामुळे आचारसंहिता लागू असल्यामुळे विकास कामांना ब्रेक लागला होता. परंतु,आता निवडणुकीची प्रक्रिया संपताच शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी नगरसेवकांना कामाला लागण्याच्या सूचना केले आहेत. शहरातील प्रभाग क्र.१ मधील संयम पार्क, मोडक नगर, सिटी पार्क,जानकी विहार,मंथन पार्क डि.के टाउन मधील रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ नगरसेवक किरण रघुवंशी यांच्या हस्ते […] - [कृषी उत्पन्न बाजार समितीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार](https://publicmirrornews.com/45867/): नंदुरबार l प्रतिनिधी- कृषी उत्पन्न बाजार समिती, नंदुरबार येथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेला सेवानिवृत्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती दीपक मराठे, ज्येष्ठ मार्गदर्शक बी. के. पाटील, संचालक विक्रमसिंग वळवी, किशोर पाटील, ठाणसिंग राजपूत, शरदभाई पटेल, लकडु चौरे, प्रकाश माळी यांच्यासह इतर सन्माननीय पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी सेवानिवृत्त झालेले कर्मचारी राजेंद्र गुलझासिंग गिरासे, रविंद्र वानखेडे तसेच संजय वाणी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ मार्गदर्शक बी. के. पाटील, विक्रमसिंग वळवी तसेच प्रकाश माळी यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवाकालावधीत केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. विशेषतः राजेंद्र गिरासे यांनी […] - [नायलॉन मांजा: वापरासाठी 50 हजार, तर विक्रीसाठी अडीच लाखांचा दंड प्रस्तावित](https://publicmirrornews.com/45864/): नंदुरबार l प्रतिनिधी- बॉम्बे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नायलॉन मांजाच्या सर्रास वापरामुळे होणाऱ्या गंभीर अपघात, जखमा आणि मृत्यूच्या घटनांची गंभीर दखल घेतली आहे या पार्श्वभूमीवर, न्यायालयाने नायलॉन मांजाचा वापर व विक्री पूर्णतः प्रतिबंधित केली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. *प्रस्तावित दंडात्मक कारवाई:* • *अल्पवयीन व्यक्ती:* अल्पवयीन व्यक्ती नायलॉन मांजाने पतंग उडवताना आढळल्यास, त्यांच्या पालकांना न्यायालयात रुपये 50 हजार जमा करण्याचे आदेश का देऊ नयेत, अशी विचारणा केली आहे. • *प्रौढ व्यक्ती:* प्रौढ व्यक्ती नायलॉन मांजाने पतंग उडवताना आढळल्यास, संबंधित व्यक्तीला न्यायालयात रुपये 50 […] - [जुगार अड्ड्यावर धाड, 14 लाखाचा मुद्देमाल जप्त, दोन राज्यातील 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल](https://publicmirrornews.com/45861/): नंदुरबार | प्रतिनिधी नवापूर-सुर रस्त्यावरील गुडलक टायर सर्व्हीस सेंटरच्या मागे पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या झन्ना मन्ना जुगार अड्डयावर पोलीसांनी छापा टाकून १४ लाख ३६ हजार ६०२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात रोख रक्कम, मोबाईल, वाहने, जुगाराचे साहित्याचा समावेश आहे. याप्रकरणी ४० जणांविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर-सुरत रस्त्यालगत गुडलक टायर सर्विस सेंटरच्या पाठीमागे एका बंदीस्त पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदा ५२ पत्त्यांचा झन्ना मन्ना नावाचा जुगार सुरु असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने गुडलक टायर सर्विस सेंटरच्या पाठीमागे बंदीस्त पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला. शेडमध्ये लाकडी टेबलाभोवती खुच्यार्ंवर अवैधरित्या जुगार […] - [नंदुरबारात शिवसेना शिंदे गटाचा महाविजयी सभेत 'लाव रे तो व्हिडिओ](https://publicmirrornews.com/45858/): ‘ नंदुरबार l प्रतिनिधी विकास कामांमध्ये कधीही भेदभाव केलेला नाही आणि भविष्यात देखील करणार नाही. नंदनगरीच्या सेवेसाठी नेहमी कटिबद्ध राहून समतोल विकासाची ग्वाही देत शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेना शिंदे गटाचा महाविजयी सभेत ‘लाव रे तो व्हिडिओ’ च्या माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधत खरपून समाचार घेतला. नंदुरबार नगरपरिषदेवर शिवसेनेच्या भगवा फडकल्यानंतर सुभाष चौकात महाविजयी सभा घेण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून आ. रघुवंशी बोलत होते. सभेचा ठिकाणी व्यासपीठाचा मागील बाजूस मोठी एलईडी स्क्रीन लावण्यात आली होती. त्या स्क्रीनवर ‘लाव रे तो व्हिडिओ’ च्या माध्यमातून आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी विरोधकांवर आरोप करत निशाणा साधला. ते म्हणाले,ज्यांनी आयुष्यभर आदिवासींच्या योजनेत भ्रष्टाचार केला, गाईंच्या […] - [द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये संस्कार, कला व गुणवत्तेचा उत्सव, सांस्कृतिक महोत्सव व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात](https://publicmirrornews.com/45853/): नंदुरबार l प्रतिनिधी- विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता कला, क्रीडा, संस्कार व सामाजिक जबाबदारी यांचा समतोल साधावा, असे आवाहन केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. येथील का. वि. प्र. संस्था, भालेर संचलित द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूल येथे सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरण समारंभ उद्घाटन प्रसंगी माजी मंत्री,आ. डॉ. गावित हे मार्गदर्शन केले. अत्यंत उत्साही, आनंदी व शिस्तबद्ध वातावरणात मोठ्या थाटात पार पडला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा तसेच त्यांच्यातील आत्मविश्वास, सर्जनशीलता व सामाजिक जाणीव वृद्धिंगत करणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला. कार्यक्रमाची सुरुवात सर्व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या समूह नृत्याने करण्यात आली. […] - [बांगलादेशावर निर्बंध घालण्यासह तेथील कट्टरतावादी गटांवर कारवाईची हिंदू संघटनांनी मागणी](https://publicmirrornews.com/45850/): नंदुरबार l प्रतिनिधी- बांगलादेशातील हिंदू दीपू चंद्रदास याची कट्टरतावादी जमावाने झाडाला बांधून जिवंत जाळून हत्या करणे, हिंदूंची घरे, दुकाने जाळणे पुन्हा चालू केले आहे. हिंदु जनजागृती समितीने हिंदूविरोधी हिंसाचाराचा तीव्र निषेध करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्र अमित शाह तसेच बांगलादेश उच्चायुक्त यांना कारवाई करण्यासाठीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे साहेब यांच्या माध्यमातून सादर केले. यावेळी उद्योगपती नितेश अग्रवाल, भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पंकज चौधरी, विश्व हिंदु परिषदेचे अजय कासार, शक्ती हनुमान ट्रस्ट चे सुरेश भोई, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे नरेंद्र तांबोळी रवींद्र पवार,रवींद्र सोपनार, अधिवक्ता वर्षा पाटील, रणरागिणी जॉली शाह, निशा जैन, कु.अश्लेषा पवार, ध्वनी शाह, नम्रता परदेशी, सौ. […] - [शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही,लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या इशारा](https://publicmirrornews.com/45847/): शहादा l प्रतिनिधी शहरातील डम्पिंग ग्राउंड वर कोट्यावधी रुपये खर्च करूनही सद्यस्थितीत कचरा सुरक्षित व शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापित होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करत शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही. कचरा वर्गीकरण ,नियमित उचल ,सुरक्षित साठवणूक व आधुनिक पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा स्पष्ट सूचना शहाद्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी स्वच्छता अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिला.   शहाद्याचे नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शुक्रवारी सकाळी शहराबाहेरील दोंडाईचा रस्त्यावर असलेल्या डंपिंग ग्राउंड ला भेट देत तेथील परिस्थिती ची पाहणी करीत पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी संपूर्ण डम्पिंग ग्राउंड ची पाहणी करतेवेळी स्वच्छता विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अशी स्थिती का […] - [नंदुरबार येथील एस. ए. चर्च येथे नाताळनिमित्त सामूहिक प्रार्थना](https://publicmirrornews.com/45843/): नंदुरबार l प्रतिनिधी- नंदुरबार येथील मिशन कंपाउंड मधील एस ए चर्च मार्फत नाताळनिमित्त झालेल्या सामूहिक प्रार्थना कार्यक्रमात अनुप वळवी यांनी मार्गदर्शन केले.   नंदुरबार येथील मिशन कंपाऊंड परिसरातील चर्चमध्ये नाताळनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले त्यात सकाळी आठ वाजता सामूहिक प्रार्थना घेण्यात आली यावेळी अनुप वळवी यांनी नाताळ व येशू ख्रिस्ताच्या जन्माची माहिती दिली. यावेळी एस एच चे अध्यक्ष डॉ. राजेश वळवी, प्राचार्य नूतनवर्षा वळवी, जे.एच.पठारे, दिलीप नाईक डॉक्टर राजेश वसावे लता कालू यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामूहिक प्रार्थनेत त्यांनी सहभाग नोंदविला - [अवैधरित्या दारुची वाहतूक करणाऱ्याविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ,23 लाखाची दारू पकडली.दोघांना अटक](https://publicmirrornews.com/45840/): नंदुरबार l प्रतिनिधी- अवैधरित्या दारुची वाहतूक करणाऱ्याविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई करीत तब्बल 40 लाख 38 हजार 560 रुपये किमतीचे 232 पेटयांचा मुद्देमाल वाहनांसह जप्त केला.याप्रकरणी 2 संशयित आरोपी ताब्यात घेतले आहे. नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शहेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, बऱ्हाणपूर-अंकलेश्वर मार्गाने गुजरात राज्यात एका पांढऱ्या रंगाच्या विना नंबरची टाटा कंपनीचा 407 मॉडेल हया वाहनामध्ये विनापास विदेशी दारुची वाहतुक होणार असुन त्या वाहनाला पांढऱ्या रंगाची सुजूकी व्हॅगनर पायलटींग करणार असलेबाबत खात्रीशिर माहिती मिळाली. सदर माहितीचे आधारे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकास बातमीची खात्री […] - [नंदुरबार मध्ये भाजपाचा विजय रोखण्यासाठी घडवला गेलाय वोट जिहाद ; डॉ.हिना गावित](https://publicmirrornews.com/45837/): नंदुरबार l प्रतिनिधी– नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या विरोधात शिवसेनेला मिळालेला विजय हिंदुत्वाचा नसून वोट जिहादचा आहे; असा घणघाती आरोप भाजपाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी आज पत्रकार परिषदेत केला. भाजपाचा विजय होणार असे लक्षात घेऊन भाजपाला रोखण्यासाठीच शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी एमआयएम सारख्या कट्टर पक्षासोबत छुपी हात मिळवणी केली; असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.   नंदुरबार नगरपालिका निवडणूक निकाल तीन दिवसापूर्वी घोषित झाले असून शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी वीस वर्षांपासूनची सत्ता अबाधित राखणारा विजय प्राप्त केला आहे. या निवडणुकीत अत्यंत नवख्या उमेदवारांना घेऊन भारतीय जनता पार्टीने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली […] - [नवनियुक्त नगरसेवकांसह डॉ. हिना गावित यांनी केले भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन](https://publicmirrornews.com/45834/): नंदुरबार l प्रतिनिधी- भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त नवनियुक्त नगरसेवकांसह संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण अभिवादन केले.   नंदुरबार शहरातील आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत प्रतिमा पजनाचा कार्यक्रम करण्यात आला. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्व उपस्थित त्यांनी भावपूर्ण अभिवादन केले. याप्रसंगी संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित, नवनियुक्त नगरसेवक तथा विरोधी पक्षनेता हिरालाल चौधरी, माजी नगरसेवक चारुदत्त कळवणकर, नवनियुक्त नगरसेवक पंकज चौधरी, आकाश चौधरी, माणिक माळी, संजय सोनार, नरेश कांकरिया, योगेश पाटील, दीपक […] - [माजी मंत्री स्व. स्वरुपसिंगजी नाईक यांच्यावर शासकीय इतमामात भावपूर्ण अंत्यसंस्कार](https://publicmirrornews.com/45831/): नंदुरबार l प्रतिनिधी- धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री स्व. स्वरुपसिंगजी नाईक यांच्या निधनाने डोंगरदऱ्यातील सर्वसामान्य, उपेक्षित व आदिवासी जनतेसाठी आयुष्यभर झटणारा एक लोकनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे भावोत्कट विधान आज राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे. माजी मंत्री स्व. स्वरुपसिंग नाईक यांच्यावर आज नवागाव (ता. नवापूर) येथे शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने उपस्थित राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचे पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन अभिवादन केले त्या प्रसंगी श्रद्धांजली अर्पण करताना मंत्री रावळ बोलत […] - [सर्वसामान्यांसाठी लढणारे संवेदनशील नेतृत्व हरपले: उपमुख्यमंत्री अजित पवार,माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली](https://publicmirrornews.com/45828/): मुंबई l प्रतिनिधी माजी मंत्री, ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील अनुभवी, लोकाभिमुख, संवेदनशील व मार्गदर्शक नेतृत्व हरपले असल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, माजी मंत्री सुरूपसिंग नाईक हे आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारे एक लढवय्ये नेतृत्व होते. त्यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत विविध खात्यांचा कार्यभार अत्यंत समर्थपणे सांभाळला. आदिवासी विकास, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, शिक्षण व कृषी क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. शेतकरी, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या हितासाठी त्यांनी अखंडपणे कार्य केले. नंदुरबार जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासात […] - [मिशन हायस्कूल येथे ख्रिसमस निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन](https://publicmirrornews.com/45821/): नंदुरबार l महेश पाटील नंदुरबार येथील एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे नाताळ सणाचे औचित्य साधून 2025 ह्या वर्षाचा “नाताळ सांस्कृतिक कार्यक्रम” मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मनिष पाडवी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यानंतर रेव्ह.अनुप वळवी यांनी प्रार्थना सादर केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन मार्था अक्का सुतार, कार्यकारी संचालक डॉ. राजेश वळवी, व्हाईस चेअरमन हर्षानंद कालू, एस.ए.शिरसाठ, डॉ.राजेश वसावे, इडा जयनर,एलिया जयनर, रूथ जयनर आदी उपस्थित होते या मान्यवरांचे स्वागत शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षां वळवी, उपमुख्याध्यापक विजय पवार, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक मीनलकुमार वळवी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. […] - [मिशन हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे उत्साहात आयोजन: चिमुकल्या शास्त्रज्ञांच्या कल्पकतेने सर्व थक्क](https://publicmirrornews.com/45818/): नंदुरबार l प्रतिनिधी- नंदुरबार येथील मिशन हायस्कूलमध्ये वार्षिक विज्ञान प्रदर्शनाचे अतिशय भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांनी आणि वैज्ञानिक मॉडेल्सनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी उपशिक्षणाधिकारी डॉ.निलेश लोहकरे यांनी वेद कापून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. व्यासपीठावर शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षा वळवी यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी उपप्राचार्य विजय पवार,पर्यवेक्षिका वंदना जांबीलसा, पर्यवेक्षक मीनलकुमार वळवी आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमास शुभेच्छा देताना डॉ. निलेश लोहकरे यांनी आपल्या मनोगतात म्हटले की नंदुरबार येथील विद्यार्थी राष्ट्रीयस्तरापर्यंत जावेत व नंदुरबार मधूनही शास्त्रज्ञ तयार व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा […] - [शहादा नगरपालिका नगराध्यक्षपदी जनता विकास आघाडीचे अभिजीत पाटील 1041 मतांनी विजयी](https://publicmirrornews.com/45803/): नंदुरबार l प्रतिनिधी-   शहादा नगरपालिकेसाठी दोघांमध्ये समोरासमोर लढत असून भाजपातर्फे प्रा. मकरंद नगीन पाटील, जनता विकास आघाडीतर्फे अभिजित मोतीलाल पाटील तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतर्फे खाटीक मकसूद शेख गफ्फार नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उभे आहेत. सकाळी दहा वाजेला मतमोजणीला सुरुवात होणार आहे.   टपाल मत:   पहिली फेरी :         नंदुरबार फ्लॅश…         शहादा नगरपरिषद…         जनता विकास आघाडी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभिजीत पाटील पहिला फेरीअंती 5832 मतांनी आघाडीवर…         भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मकरंद पाटील पहिल्या फेरीअंती 1725 मतांनी पिछाडीवर….         राष्ट्रवादी अजित पवार […] - [ब्रेकिंग :तळोदा नगरपरिषदेत मतमोजणीची आकडेवारी](https://publicmirrornews.com/45773/): नंदुरबार l प्रतिनिधी- तळोदा नगरपालिकेसाठी तिरंगी लढत आहे. यात भाजपातर्फे जितेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी, शिंदे शिवसेना गट हितेंद्र सरवनसिंग क्षत्रिय तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतर्फे भाग्यश्री योगेश चौधरी नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहेत. दहा वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे. टपाल मत: पहिली फेरी :   *तळोदा नगरपरिषद* पहिली फेरी 1ते 5 प्रभाग तळोदा पालिकेसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार भाग्यश्री चौधरी 1058 मतांनी आघाडीवर.   तळोदा नगरपरिषद* दुसरी फेरी 1ते 5 प्रभाग तळोदा पालिकेसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार भाग्यश्री चौधरी 1833 मतांनी आघाडीवर.   *तळोदा नगरपरिषद* तिसरी फेरी 1ते 5 प्रभाग   तळोदा पालिकेसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार भाग्यश्री चौधरी […] - [ब्रेकिंग : नवापूर नगरपरिषदेत मतमोजणीची आकडेवारी](https://publicmirrornews.com/45769/): नंदुरबार l प्रतिनिधी- नवापूर नगरपालिकेसाठी चौरंगी लढत असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतर्फे जयवंत पांडुरंग जाधव, भाजपातर्फे अभिलाषा चिन्मय वसावे, जिल्हा विकास आघाडीतर्फे विश्वास भीमराव बडोगे तर काँग्रेस तर्फे डॉ. दिपचंद प्रेमलाल जयस्वाल नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उभे आहेत. सकाळी दहा वाजेला मतमोजणीला सुरुवात होणार आहे.   टपाल मत:     पहिली फेरी :   नवापुर नगरपरिषद* राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) / जयवंत जाधव पहिल्या फेरीत आघाडीवर   नवापूर नगरपरिषद प्रभाग क्रमांक 1,2,3,4 मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार जयवंत जाधव यांना 1257 चा लीड   राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सात उमेदवार विजयी एक भाजपचा एकूण आठ उमेदवारांचा निकाल जाहीर   नवापूर […] - [ब्रेकिंग : नंदुरबार नगरपरिषदेत मतमोजणीची आकडेवारी](https://publicmirrornews.com/45767/): नंदुरबार l प्रतिनिधी- नंदुरबार नगरपालिकेसाठी दोघांमध्ये समोरासमोर लढत असून शिंदे शिवसेकडून सौ. रत्ना चंद्रकांत रघुवंशी, भाजपातर्फे अविनाश महादू माळी तर ठाकरेंची शिवसेनेतर्फे सौ.संगीता खंडू माळी नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उभे आहेत. सकाळी दहा वाजेला मतमोजणीला सुरुवात होणार आहे. टपाल मत: पहिली फेरी :   *नंदुरबार नगरपरिषद* *शिवसेना (शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रत्ना रघुवंशी या/ पहिल्या फेरी अंती जवळपास 1350 मतांनी आघाडीवर तर नगरसेवक पदासाठी निवडणूक आलेले पक्षीय उमेदवार एकुन प्रभाग 20 नगरसेवक जागा 41 *शिवसेना शिंदे गट* – 04 *भाजपा* – *एमआयएम* –   *नंदुरबार नगरपरिषद* *शिवसेना (शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रत्ना रघुवंशी या/ पहिल्या फेरी अंती जवळपास 3517 […] - [ब्रेकिंग : शहादा नगरपरिषदेत मतमोजणीची आकडेवारी](https://publicmirrornews.com/45764/): नंदुरबार l प्रतिनिधी- शहादा नगरपालिकेसाठी दोघांमध्ये समोरासमोर लढत असून भाजपातर्फे प्रा. मकरंद नगीन पाटील, जनता विकास आघाडीतर्फे अभिजित मोतीलाल पाटील तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतर्फे खाटीक मकसूद शेख गफ्फार नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उभे आहेत. सकाळी दहा वाजेला मतमोजणीला सुरुवात होणार आहे. टपाल मत: पहिली फेरी :   नंदुरबार फ्लॅश…   शहादा नगरपरिषद…   जनता विकास आघाडी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभिजीत पाटील पहिला फेरीअंती 5832 मतांनी आघाडीवर…   भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मकरंद पाटील पहिल्या फेरीअंती 1725 मतांनी पिछाडीवर….   राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मकसूद खाटीक पहिल्या फेरीअंती 594 मतांनी पिछाडीवर..     नंदुरबार फ्लॅश   नंदुरबार:- शहादा […] - [नंदुरबार पालिकेसाठी काटे की टक्कर, निकालासाठी 18 दिवसांची प्रतीक्षा,उद्या होणार मतमोजणी](https://publicmirrornews.com/45761/): नंदुरबार l प्रतिनिधी- नंदुरबार पालिका निवडणुकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर आता 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी पालिका प्रशासन आणि निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे. पालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी शिंदे शिवसेनेच्या उमेदवार सौ. रत्नाताई रघुवंशी व भाजपाचे अविनाश माळी यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळत असून 18 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर उद्या मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. नंदुरबार पालिकेसाठी 11 फेऱ्यांमध्ये मतमोजणी केली जाणार आहे. मतमोजणी सुरू झाल्यानंतर साधारणतः 2 तासांत अर्थात 12 वाजेपर्यंत निकालाचा कल स्पष्ट होणार आहे. नंदुरबार पालिकेसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान झाले होते. लागलीच दुसऱ्या दिवशी अर्थात 3 डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाणार होती; परंतु निवडणूक आयोगाने निर्णय […] - [याहामोगीपाडा व खाकरपानीपाडा येथे त्वरित विजेची सोय करा,शिंदे शिवसेनेची मागणी](https://publicmirrornews.com/45757/): नंदुरबार l प्रतिनिधी-        शहादा जि.नंदुरबार या तालुक्यातील कन्साई ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या याहामोगीपाडा व खाकरपानीपाडा येथे त्वरित विद्युतीकरण करुन तात्काळ विजेची सोय उपलब्ध करुन देणे बाबतचे निवेदन शिवसेना शहादा तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांच्या नेतृत्वात शिवसेने तर्फे वीज वितरण कंपनीचे शहादा विभागाचे उप कार्यकारी अभियंता अशोक पाटील यांना देण्यात आले आहे.      शहादा तालुका शिवसेने मार्फत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,शहादा तालुक्यातील कन्साई ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शंभर टक्के आदिवासी समाज वस्ती असणाऱ्या याहामोगीपाडा व खाकरपानीपाडा या दोन्ही पाड्यात सुमारे शंभर घरे असुन सुमारे एक हजार लोकवस्ती असणारे गावपाडे आहेत.२०२२/२०२३ या वर्षात विद्युतीकरण करणे करिता सर्वेक्षण करण्यात आले […] - [खाकीसाठी जिद्दीची धाव; युवा उमेदवारांसाठी भामरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे ऐतिहासिक सराव चाचणी; ६०० हून अधिक तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग](https://publicmirrornews.com/45754/): नंदुरबार l प्रतिनिधी- खाकी वर्दीची ओढ आजही तरुणांच्या मनात तितक्याच जोमात आहे. अनेक तरुण पोलीस खात्यात भरती होऊन भविष्यात स्थैर्य आणि सेवा करण्याची इच्छा बाळगतात. मात्र, प्रत्यक्ष भरतीदरम्यान शारीरिक चाचणी तसेच लेखी परीक्षेतील तांत्रिक चुका आणि दडपणामुळे अनेकदा उमेदवारांना अपयशाला सामोरे जावे लागते. याच पार्श्वभूमीवर नंदुरबार येथील भामरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्यावतीने आधुनिक आरएफआयडी चीफ तंत्रज्ञानाचा वापर करुन जिल्ह्यात प्रथमच पोलीस भरतीपूर्व सराव चाचणीचे आयोजन करण्यात आले.     या उपक्रमाला नंदुरबारसह आसपासच्या नंदुरबारसह खानदेशात तरुणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ६०० पेक्षा अधिक युवक-युवतींनी पहाटेपासूनच जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर हजेरी लावून सराव चाचणीमध्ये सहभाग नोंदविला. मैदानावर उपस्थित असलेल्या प्रत्येक उमेदवाराला […] - [राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत वैष्णवी मानकरला सुवर्णपदक](https://publicmirrornews.com/45751/): नंदुरबार l प्रतिनिधी नंदुरबार शहरातील एकलव्य विद्यालयात इयत्ता 10 वी मध्ये शिकणाऱ्या वैष्णवी मानकरने राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. 27 ते 30 नोव्हेंबर पर्यंत आगरतळा त्रिपुरा येथे 69 व्या शालेय राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा पार पडल्या त्यात महाराष्ट्र राज्याने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकाची कमाई केली.महाराष्ट्राच्या संघात नंदुरबारच्या वैष्णवी मानकरचा समावेश होता.   नंदुरबारातील एकलव्य विद्यालयात इयत्ता 10 वी मध्ये शिकणाऱ्या वैष्णवी मानकरला या स्पर्धेत मिळालेल्या यशाने तिच्या बुद्धिबळ प्रवासात आणखी एक टप्पा गाठला आहे.तिच्या एकाग्रता रणनीती आणि कल्पनाशक्ती मुळे तिने हे यश मिळवले आहे. नंदुरबारातील अव्वलमानांकित बुद्धिबळ खेळाडू वैभव बोरसे हे तिचे वैयक्तिक प्रशिक्षक असून त्यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले. - [समुद्रावर नंदनगरीचा ठसा! दहा किमी सागरी जलतरणात देव राजपूत राज्यात आठवा](https://publicmirrornews.com/45748/): नंदुरबार l प्रतिनीधी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत दहा किलोमीटर अंतर पोहून नंदुरबार येथील देव अभयसिंग राजपूत याने टॉप टेन मध्ये स्थान मिळविले. या स्पर्धेत आठवा क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले असून देव राजपूत हा नंदुरबार जिल्ह्यातील पहिलाच मानकरी ठरला आहे.     महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्या वतीने 15 वी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे मालवण येथील चिवला बीचवर आयोजन करण्यात आले होते. 13 व 14 डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रासह 8 राज्यातील सुमारे 1500 पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत वेगवेगळ्या वयोगटात 10 किमी, 5 किमी, 3 किमी, 2 किमी, […] - [नंदुरबारसारख्या अतिदुर्गम जिल्ह्यांत सेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, उल्लेखनीय कामगिरीचा नाशिक येथे गौरव](https://publicmirrornews.com/45745/): नंदुरबार l प्रतिनिधी- नंदुरबारसारख्या अतिदुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यांतील नागरिकांनाही विहित कालावधीत शासकीय सेवा मिळाव्यात, यासाठी राज्य लोकसेवा हक्क आयोग सातत्याने प्रयत्नशील असून नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आयोग सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन नाशिक विभागाच्या राज्य सेवा हक्क आयुक्त श्रीमती चित्रा कुलकर्णी यांनी केले. नाशिक येथील राज्य सेवा हक्क आयोग कार्यालयाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी उपसचिव सुनिल जोशी, नायब तहसीलदार सचिन पोतदार, कक्ष अधिकारी उदय काण्णव, ध.र. पुराडउपाध्ये यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आयुक्त श्रीमती कुलकर्णी यांनी सांगितले की, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नाशिकसह राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी राज्य सेवा हक्क आयुक्तांची कार्यालये कार्यरत आहेत. […] - [नंदुरबार शहरातील वाढीव व अतिरिक्त घरपट्टीची सक्ती रद्द करा ,उबाठा गटाची मागणी](https://publicmirrornews.com/45742/): नंदुरबार शहरातील वाढीव व अतिरिक्त घरपट्टीची सक्ती रद्द करा ,उबाठा गटाची मागणी नंदुरबार l प्रतिनिधी- नगर परिषदेची वाढीव व ज्यादा आकाराची घरपट्टी व नळपट्टी वसुल करण्यात येत आहे तरी ती माफक व कमी दरात करण्यात यावी अशी मागणी नंदुरबार जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे. नंदुरबार शहरातील नागरिक वाढत्या महागाई ने त्रस्त आहेत. शहरात रोजगाराची समस्या आहेत शहरात उद्योग धंदे नाहीत. तरी नागरिक कसेतरी आपली उपजीविका भागवत असताना नगर पालिकेने वाढीव घरपट्टी लादल्याने नागरिकांची पिळवनुक होत आहे. तरी मुळ घर पट्टी वसुल करण्यात यावी व व्याजाचा भार नागरिकांवर लादू नये.   वाढीव घरपट्टी व्याजासह कमी करण्यात […] - [राष्ट्रीय लोकअदालतीत ४११ प्रकरणांचा सामंजस्याने निपटारा;२ कोटी ८२ लाखांची तडजोड; पाच पती-पत्नी वादांत समेट](https://publicmirrornews.com/45738/): नंदुरबार l प्रतिनिधी- राष्ट्रीय लोकअदालतीच्या निमित्ताने आज (१३ डिसेंबर २०२५ ) रोजी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये तडजोडपात्र प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे आपसी तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. या लोकअदालतीद्वारे नागरिकांना जलद, सुलभ व खर्चविरहित न्याय मिळाला. या राष्ट्रीय लोकअदालतीच्या प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर आर. पेठकर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश पी. एच. कर्वे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सतीश टी. मलिये, मुख्य न्यायदंडाधिकारी के. ए. नहार, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सौ. ए. एस. वानखडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव महेंद्र बी. पाटील, तसेच दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पी. डी. भिर्डे, आर. बी. सुर्यवंशी व एच. वाय. […] - [सैनिक व कुटुंबीयांसाठी योगदान सर्वांची जबाबदारी; डॉ. मित्ताली सेठी](https://publicmirrornews.com/45735/): नंदुरबार l प्रतिनिधी- सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी जेवढे जास्तीत जास्त योगदान देता येईल तेवढे जास्त योगदान देणे आपली सर्वांची जबाबदारी असून, ध्वजदिन निधी संकलनात पुढील वर्षी दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त निधी संकलनाचे काम जिल्ह्यात होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज केले. जिल्हा नियोजन भवन सभागृहात आज सशस्त्र सेना ध्वजदिन-2025 निधी संकलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी बोलत होत्या. या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती आशा संघवी, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, लेफ्टनंट कर्नल शशिकांत मराठे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. श्रीमती […] - [बनावट वेबसाईट,ॲप्स आणि लिंक्सपासून सावधगिरी बाळगा: उत्तम जाधव](https://publicmirrornews.com/45732/): नंदुरबार l प्रतिनिधी- ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, आणि ई-चलन सेवांशी संबंधित बनावट वेबसाइट्स, फसवे मोबाईल अॅप्स (APKs), आणि एसएमएस/व्हॉट्ॲप (SMS/WhatsApp) याद्वारे पाठविल्या जाणाऱ्या खोट्या लिंकपासून नागरिकांनी सावध रहावे असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, उत्तम जाधव यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. *फसवणूक करणारे सहसा खालील प्रकारचे संदेश पाठवून नागरिकांना जाळ्यात ओढतात:* • “आपल्या वाहनाचे चलन बाकी असून त्वरित दंड भरण्याची धमकी” आणि अनधिकृत पेमेंट लिंक पाठवणे. • वाहन चालविण्याचा परवाना (“DL”) सस्पेंड होणार आहे, त्वरित तपासणी करा” असे संदेश पाठवणे. • “RTO Services.apk”, “mParivahan_Update.apk”, “eChallan_Pay.apk” अशा नावाच्या अनधिकृत APK ॲप्स/फाईल्स डाउनलोड करण्यास प्रवृत्त करणे. *महत्त्वाची सूचना* • उप […] - [श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्त जयंती निमित्त सप्ताहाचे सांगता](https://publicmirrornews.com/45728/): नंदुरबार l प्रतिनिधी- नंदुरबार येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्रीदत्त जयंतीनिमित्त आयोजित अखंड नामजप यज्ञ सप्ताहाची सांगता आज भक्तिमय वातावरणात करण्यात आली. गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या या धार्मिक उपक्रमाचा आज सत्यदत्त पूजनाने विधिवत समारोप करण्यात आला. श्री स्वामी समर्थांच्या चरणी नमन करून सेवेकरी व मान्यवरांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने सत्यदत्त पूजन पार पडले. यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची नैवेद्य आरती मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली.महाआरती नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच सेवेकरी व भाविकांची गर्दी केंद्रात दिसून आली. अखंड नामजप सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम, स्वामी समर्थांचे अभंग, स्तोत्रांचा सामूहिक जप,होम हवन, ध्यान साधना सेवा केंद्रात पार पडली.     […] - [सारंगखेड्याचा चेतक महोत्सव ग्लोबल करण्यासाठी शासन पाठीशी:मंत्री जयकुमार रावळ](https://publicmirrornews.com/45725/): नंदुरबार l प्रतिनिधी- सुमारे चारशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेली आणि पिढ्यानपिढ्या आपला सांस्कृतिक ठेवा जपून ठेवणारी सारंगखेडा यात्रा व यात्रेनिमित्त होणाऱ्या चेतक महोत्सवाला ग्लोबल करण्यासाठी महाराष्ट्र शासन भक्कमपणे चेतक महोत्सव समितीच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावळ यांनी केले आहे.   ते सारंगखेडा येथे दत्तजयंतीनिमित्त सुरू होणाऱ्या यात्रोत्सव व चेतक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, तहसीलदार दीपक गिरासे, शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील, चेतक महोत्सवाचे प्रमुख आयोजक जयपालसिंह रावळ, सारंगखेड्याचे सरपंच पृथ्वीराज रावळ, आयोजन समितीचे प्रणवराज रावळ आदी उपस्थित होते.   […] - [पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचारी मानधनापासून वंचित, कामबंद आंदोलनाचा इशारा](https://publicmirrornews.com/45722/): नंदुरबार l प्रतिनिधी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जल जीवन मिशन अंतर्गत कार्यरत जिल्हा व तालुकास्तरीय कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित असून, अदायगीतील अनियमिततेमुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. मानधनसाठी शासनाकडे वेळोवेळी निवेदन दिल्यानंतरही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.     निवेदनात म्हटले आहे की, शासनाकडून मागील सहा महिन्यांपासून SC, ST व General या घटकानिहाय मानधन अदा केले जात आहे. त्यामुळे दर महिन्याला नियमित मानधन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दि.30 […] - [नंदुरबार शहरातील दोन टोळयांमधील 18 जणांना जिल्ह्यातून दोन वर्षासाठी केले हद्दपार](https://publicmirrornews.com/45718/): नंदुरबार l प्रतिनिधी शहरातील काही गुन्हेगारी टोळयांमध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारी हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने हद्दपारची प्रभावी कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गत दोन वेगवेगळ्या टोळयांमधील एकुण 18 आरोपी इसमांना जिल्हयातुन हद्दपार करण्यात आले आहे. नंदुरबार शहर परिसरात अलीकडच्या काळात काही गुन्हेगारी टोळया ज्यांचेवर विविध पोलीस ठाण्यात गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असुन त्यामध्ये, जिवे ठार मारण्याचा (खुनाचा) प्रयत्न करणे, सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे, विनयभंग करणे, शासकीय नोकरास अटकाव करुन शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, फौजदारीपात्र कट रचणे, जातीय दंगल करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन दंगा करणे, चोरी करणे, शिवीगाळ व दमदाटी करणे, इच्छापुर्वक गंभीर दुखापत करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान […] - [भाजपा उमेदवार मकरंद पाटील यांच्या प्रचारार्थ शहादा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा](https://publicmirrornews.com/45715/): नंदुरबार l प्रतिनिधी- शहादा येथे पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा उमेदवार मकरंद पाटील यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दि. २४ नोव्हेंबर रोजी जाहीर सभा होणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी दिली. भाजपा महामंत्री विजय चौधरी म्हणाले की, शहादा येथे आज दि. २४ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होत आहे. जिल्ह्यातील चार नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे. चारही ठिकाणी पक्षाने उमेदवार दिले आहेत. चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाजपमध्ये जिल्हाध्यक्षपद महत्वाचे आहे. त्यांना पक्षाने अधिकार दिले आहेत. तसेच नगर परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्याकरिता मला निवडणुक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे. मित्र पक्षांना युती करायची होती तर आमच्याशी बोलले […] - [शहादा येथील सराफाला लुटणाऱ्या 11 जणांना अटक,39 लाखांचा मुद्देमाल जप्त](https://publicmirrornews.com/45712/): नंदुरबार l प्रतिनिधी- शहादा येथील सराफाला लुटणारे सराईत आरोपी यांच्या ताब्यातून एकूण 38 लाख 96 हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल हस्तगत करीत 11 आरोपीना स्थानिक गुन्हे शाखा व शहादा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.     27 ऑक्टोंबर 2025 रोजी 10.10 वाजेच्या सुमारास शहादा पोलीस ठाणे हद्दीतील म्हसावद ते बुडीगव्हाण रोडवर बुडीगव्हाण गावाच्या पुढे रोडावर रितेश जयप्रकाश पारेख, व्यवसाय सराफ व्यवसाय, रा. सोनार गल्ली, मेनरोड, शहादा हे त्यांच्या चारचाकी वाहनाने म्हसावद येथे जात असतांना अज्ञात आरोपीतांनी रितेश पारेख यांच्या चारचाकी वाहनासमोर गाडी आडवी लावून त्यांच्याशी हुज्जत घालुन सराफ व्यावसायीक यांना गाडीतून खाली उतरून त्यांच्या गाडीचा काचा फोडून बळजबरीने गाडीतून खाली उतरवून आरोपीतांच्या […] - [कठोर परिश्रम,सातत्यपूर्ण अभ्यासावर जोर,'कस्तुरबा' ची सायल बनली सहाय्यक राज्यकर आयुक्त](https://publicmirrornews.com/45709/): कठोर परिश्रम,सातत्यपूर्ण अभ्यासावर जोर,’कस्तुरबा’ ची सायल बनली सहाय्यक राज्यकर आयुक्त नंदुरबार l प्रतिनिधी नंदुरबार तालुक्यातील टोकरतलाव येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाची माजी विद्यार्थिनी सायल गांगुर्डेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले असून,सहाय्यक राज्यकर आयुक्त, गट विकास अधिकारी पदावर निवड झाली आहे.ग्रामीण भागातून शिक्षण घेत कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यास,आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळवण्याचे सायलने सांगितले.     सायल गांगुर्डे ही नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित टोकरतलाव येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयची विद्यार्थिनी आहे.तिच्या यशाबद्दल शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या सत्कार करण्यात आला.     यावेळी प्राचार्य पुष्पेन्द्र रघुवंशी,कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील,माजी नगरसेविका सोनिया राजपूत उपस्थित होत्या. […] - [नागपूर पुस्तक महोत्सवात गाजणार नंदुरबारकराचे थीम साँग](https://publicmirrornews.com/45706/): नंदुरबार l प्रतिनिधी- नॅशनल बुक ट्रस्ट, नवी दिल्ली तर्फे नागपूर येथे झिरो मागील फाऊंडेशनने दि.२२ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान आयोजित केलेल्या पुस्तक महोत्सवासाठी थीम सॉंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातील ७२१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यातून नंदुरबार येथील ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार शशिकांत घासकडबी यांच्या शीर्षक गीताला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. १०,००० रूपये रोख व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून या पुस्तक महोत्सवासाठी सर्व कार्यक्रमात हे गीत स्वरबद्ध करून गायले जाणारे आहे.यामुळे नंदुरबारच्या साहित्य विश्वात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशाबद्दल शशिकांत घासकडबी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.अशी माहिती सौ.वर्षा घासकडबी यांनी दिली. - [अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्यास पालकांना दंड आणि शिक्षा होईल : उत्तम जाधव](https://publicmirrornews.com/45703/): नंदुरबार l प्रतिनिधी जिल्ह्यातील सर्व वाहनमालक/पालक यांनी आपले वाहन आपल्या अल्पवयीन मुलांना चालविण्यांस देऊ नये अन्यथा केंद्रीय मोटार वाहन अधिनियमाअंतर्गत दंड आणि शिक्षा होऊ शकेल असे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. कठोर कायदेशीर कारवाई उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी जारी केलेल्या सूचनेनुसार, अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्यास खालीलप्रमाणे गंभीर परिणाम होतील: • *दंड आणि शिक्षा:* केंद्रीय मोटार वाहन अधिनियम 199 “अ” नुसार, वाहन मालक दोषी धरले जातील. वाहन मालक/चालक यांना रुपये 25 हजार दंड आणि 3 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. • *वाहन नोंदणी रद्द:* दोषी वाहनाची नोंदणी बारा महिन्यांसाठी (एक वर्षासाठी) रद्द […] - [नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचे 53.99 लाखांचे अनुदान,ई-केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन](https://publicmirrornews.com/45700/): नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचे 53.99 लाखांचे अनुदान,ई-केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन नंदुरबार l प्रतिनिधी- नंदुरबार जिल्ह्यात सप्टेंबर 2025 महिन्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या मोठ्या नुकसानीनंतर शासनाने तातडीची मदत म्हणून 53,99,000/- रुपये (रुपये त्रेपन्न लाख नव्व्याण्णव हजार मात्र) इतक्या अनुदानाची तरतूद करून ती डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिली आहे. एकूण 918 शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान नोंदवले गेले असून, त्यापैकी 603 शेतकऱ्यांना 36,85,120/- रुपये (रुपये छत्तीस लाख पंच्याऐंशी हजार एकशे वीस मात्र) अनुदान वितरित करण्यात आले आहे. शिल्लक 315 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपले ई-केवायसी (E-KYC) पूर्ण केल्यास त्यांचे अनुदान तात्काळ खात्यात जमा होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती […] - [श्रीमती क. पू. पाटील माध्यमिक विद्यालयाच्या सौर जलतापक उपकरणास इन्स्पॉयर अवॉर्डमध्ये विजेता उपकरणाची राज्यस्तरावर निवड](https://publicmirrornews.com/45697/): श्रीमती क. पू. पाटील माध्यमिक विद्यालयाच्या सौर जलतापक उपकरणास इन्स्पॉयर अवॉर्डमध्ये विजेता उपकरणाची राज्यस्तरावर निवड नंदुरबार l प्रतिनिधी- भालेर ता.. नंदुरबार येथील श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयातील आठवीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले सौर जलतापक अभिनव वैज्ञानिक उपकरण थेट इन्स्पॉयर अवॉर्ड २०२३_२४ मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडले जाऊन गावाचे व शाळेचे तसेच नंदुरबार जिल्ह्याचे नाव राज्य पातळीवर उज्वल केले आहे. विज्ञानातील कल्पकतेला, शिक्षकांच्या मार्गदर्शनाला आणि विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रम घेऊन हे यश म्हणजे शाळेसाठी व जिल्ह्यासाठी मामाचा तुरा होय. या उपकरणात दाखवलेली वैज्ञानिक समज, तंत्रज्ञानाची जाण आणि समस्यांवरील कल्पकता व उपाय पाहून परीक्षकही प्रभावित झाले. शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, उपशिक्षणाधिकारी सोनवणे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन […] - [राजकीय वादामुळे महायुतीवर परिणाम होईल असे भाष्य नको; पक्षश्रेष्ठींचे आदेश : आ.चंद्रकांत रघुवंशी](https://publicmirrornews.com/45692/): नंदुरबार l प्रतिनिधी शहराचा सर्वांगीण विकास हाच शिवसेनेचा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा राहणार आहे. एकंदरीत या शहराचा विकास आमच्या नेतृत्वाखालीच झालेला आहे. शिवसेनेच नेतृत्वच या शहराचा विकास करू शकते असा आत्मविश्वास नागरिकांना असल्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने निवडणुकीला सामोरे जात आहोत. दरम्यान, स्थानिक अंतर्गत राजकीय वादामुळे महायुतीवर परिणाम होईल असे भाष्य किंवा आरोप,प्रत्यारोप एकमेकांवर करू नये असे आदेश वरिष्ठ नेत्यांनी दिल्याचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले. शिवसेना भवन,आमदार कार्यालयात निवडणुकी संदर्भात माहिती देण्यासाठी मंगळवारी पत्रकार परिषद घेण्यात आली त्याप्रसंगी आ.रघुवंशी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पुढे ते म्हणाले, नंदुरबार तळोदा नगरपालिका निवडणुकीत पूर्ण क्षमतेने शिवसेनेने उमेदवार दिलेले आहेत. नवापूर आणि शहाद्यात मित्र पक्षाची भूमिका […] - [निष्ठावान कार्यकर्त्यासाठी माजी खा.डॉ.हिना गावित स्वतः बनल्या सूचक, केतन रघुवंशी यांच्या उमेदवारी अर्जावर दिली स्वाक्षरी](https://publicmirrornews.com/45689/): निष्ठावान कार्यकर्त्यासाठी माजी खा.डॉ.हिना गावित स्वतः बनल्या सूचक, केतन रघुवंशी यांच्या उमेदवारी अर्जावर दिली स्वाक्षरी नंदुरबार l प्रतिनिधी- निष्ठावान कार्यकर्ता म्हटला की नेत्याची मेहरनजर त्या कार्यकर्त्यावर असतेच. याचा प्रत्यय आज नंदुरबार येथे उमेदवारी दाखल करताना आला. भाजपाचे नेते माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांचे निष्ठावान कार्यकर्ते तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष केतन भैय्या रघुवंशी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना महासंसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी स्वतः सूचक म्हणून स्वाक्षरी दिली आणि आवर्जून उपस्थित राहिल्या. तो प्रसंग पाहून भाजपाच्या उपस्थित कार्यकर्त्यांचा उत्साह आणखी द्विगुणीत झालेल पाहायला मिळाला. कोणाच्या उमेदवारी अर्जावर स्वतः नेत्याने सूचक म्हणून स्वाक्षरी केल्याचे […] - [भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत रक्तदान शिबिर](https://publicmirrornews.com/45685/): नंदुरबार l प्रतिनिधी- नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत रक्तदान शिबिर घेण्यात आले.यावेळी 75 रक्तदात्यानी रक्तदान केले. बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती निमित्त सिविल हॉस्पिटल व जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर जिल्हा रुग्णालय रक्तपेढी येथे घेण्यात आले. या प्रसंगी 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी डॉक्टर नरेश पाडवी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांनी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून या शिबिराचे उदघाटन केले या प्रसंगी डॉ. रमा वाडीकर, डॉ. रणजीत पावरा, डॉ. आशिष राऊत, डॉ. शामकांत पथरवात, डॉ. कमलाकर चौरे, श्री. विनायक गावित उपस्थित होते.तसेच या शिबिरासाठी […] - [हरणखुरी गावाचे आरोग्यदूत पाऊल : पात्र लाभार्थ्यांची १०० टक्के आयुष्मान कार्ड नोंदणीची ऐतिहासिक कामगिरी](https://publicmirrornews.com/45682/): नंदुरबार l प्रतिनिधी- मुख्यमंत्री ग्रामसमृद्धी अभियान आणि आदर्श ग्राम अभियान अंतर्गत गृप ग्रामपंचायत भुजगाव यांच्या पुढाकारातून आयुष्मान भारत कार्ड नोंदणी यशस्वीरीत्या केली आहे. धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील एक लहानसे गाव हरणखुरी आज संपूर्ण जिल्ह्यातच एक प्रेरणास्त्रोत ठरत आहे. कारण हरणखुरी हे धडगाव जिल्ह्यातील पहिले असे गाव ठरले आहे, जिथे १००% पात्र लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत कार्ड नोंदणी यशस्वीरीत्या पार पडली आहे. ही योजना राबवतांना केवळ प्रशासन नव्हे, तर ग्रामपंचायत सदस्य, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, स्थानिक युवक, आणि खुद्द सरपंच यांनी अतुलनीय मेहनत घेतली आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाला “आयुष्मान भारत – जन आरोग्य योजना” अंतर्गत विमा संरक्षण मिळावे, हा निर्धार ग्रामपंचायतीने केला […] - [संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत बोकळझर, कळंबू ग्रामपंचायतींची तपासणी](https://publicmirrornews.com/45679/): नंदुरबार l प्रतिनिधी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत जिल्ह्यात प्रथम व द्वितीय आलेल्या अनुक्रमे बोकळझर ता. नवापूर   व कळंबू ता. शहादा या ग्रामपंचायतींची जळगाव जिल्हा परिषदेचे जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने विभागस्तरीय तपासणी केली.     जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जल जीवन  मिशनचे प्रकल्प संचालक आय. बी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. सन 2023-24 या वर्षात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात नंदुरबार जिल्ह्यात बोकळझर ता. नवापूर या ग्रामपंचायतीने प्रथम तर कळंबू ता.शहादा या ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक मिळवला आहे.शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्ह्यात प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींची […] - [जिल्हा युवा साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन, ग्रंथदिंडी, पुस्तक प्रकाशन, परिसंवाद, कवी संमेलनाने रसिक मंत्रमुग्ध](https://publicmirrornews.com/45676/): जिल्हा युवा साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन, ग्रंथदिंडी, पुस्तक प्रकाशन, परिसंवाद, कवी संमेलनाने रसिक मंत्रमुग्ध नंदुरबार – प्रतिनिधी बदललेल्या वातावरणात साहित्यिकांची जबाबदारी अधिक वाढली आहे. त्यामुळे विचारपूर्वक शब्द मांडून आपल्या साहित्याची रचना करावी, असे प्रतिपादन साहित्य अकादमी दिल्लीचे सदस्य डॉ.नरेंद्र पाठक यांनी केले. मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ तर्फे श्रीजी वाचनालयाच्या आरोग्य महोत्सवानिमित्त आज कन्यादान मंगल कार्यालय येथे जिल्हास्तरीय युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन डॉ. पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. संमेलनाचे अध्यक्ष प्रभाकर भावसार अध्यक्षस्थानी होते. यावेळी ठाणे येथील गीतेश  शिंदे, युवा कादंबरीकरण प्रवीण पवार, ग्रंथालय अधिकारी धर्मसिंग वळवी, पश्चिम […] - [जिल्ह्यांत १९ लाख ५५ हजार नागरिकांची तपासणी होणार,आजपासून कुष्ठरोग शोध अभियान](https://publicmirrornews.com/45672/): नंदुरबार l प्रतिनिधी- जिल्ह्यांत कुष्ठरोग प्रसार शून्यावर आणण्यासाठी १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान ‘कुष्ठरोग शोध अभियान’ राबविण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे,डॉ विनय सोनवणे ल,जिल्हा शल्यचिकित्सक आणि डॉ महेंद्र चव्हाण,सहायक संचालक, कुष्टरोग यांनी दिली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात *मा. जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेठी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नमन गोयल* यांच्या आदेशाने व मार्गदर्शन खाली हे अभियान १४ दिवसांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. राज्याने सन २०२७ पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसाराचे ध्येय निश्चित केले आहे. या ध्येयाच्या अनुषंगाने, कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त नवीन कुष्ठरोग […] - [लहान शहादा प्राथमिक आरोग्य केंद्रास राष्ट्रीय सन्मान](https://publicmirrornews.com/45668/): नंदुरबार | प्रतिनिधी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली रंगावली सभागृहात नवसंजीवनीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य सेवा, मातृत्व व बाल आरोग्य उपक्रम, पोषण सुधारणा कार्यक्रम, तसेच विविध आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. बैठकीस नमन गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार, डॉ. रवींद्र सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. विनय सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक, तालुका आरोग्य अधिकारी, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी, कार्यक्रम अधिकारी, NGO प्रतिनिधी,लतिका राजपूत, डॉ. कांतीलाल टाटिया, डॉ. राजेश वळवी, तसेच बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.   जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण: नंदुरबार जिल्हा स्थापनेपासून प्रथमच लहान शहादा प्राथमिक आरोग्य केंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता हमी […] - [अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांची जिल्हाधिकारी यांनी घेतली भेट](https://publicmirrornews.com/45665/): नंदुरबार | प्रतिनिधी मोलगी-अक्कलकुवा-आमलीबारी घाटातील शाळा बस अपघातस्थळाला जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची भेट दिली. दिनांक 9 नोव्हेंबर रोजी मोलगी-अक्कलकुवा आमलीबारी घाटात झालेल्या दुर्दैवी शाळा बस अपघातानंतर आज जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. या अपघातात मृत्यू झालेल्या दोन विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांची वैयक्तीक भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना धीर दिला आणि शासनामार्फत सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे.तसेच सर्व आवश्यक मदत तत्काळ देण्यात येईल, असे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी यांनी स्थानिक प्रशासन, पोलीस विभाग व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून या दुर्घटनेची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांच्या प्रवास सुरक्षेसंदर्भात ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.   शाळा बस वाहतुकीसंबंधी नियमांचे […] - [वृद्धास जीवेठार मारणाऱ्या महिलेस न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा](https://publicmirrornews.com/45662/): नंदुरबार l प्रतिनिधी- अक्कलकुवा तालुक्यातील कुंडी गावाच्या शिवारात वृद्धास जीवेठार मारणाऱ्या महिलेस न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील कुंडी गावाचे शिवारात कंजाला नदी जवळ फरशीखाली एका पुरुषाचे प्रेत पडलेले दिसले. या माहितीवरुन तेथील कुंडी गावाचे पोलीस पाटील रजनिकांत वसावे घटनास्थळी गेले असता तेथे त्यांना अंदाजे ७० वर्षीय वयोवृध्द पुरुष रक्तबंबाळ अवस्थेत मयत स्थितीत दिसला होता. त्यावरुन पोलीस पाटील वसावे यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यास सदरची माहिती दिली. त्यावरुन अक्कलकुवा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे व त्यांचे पथक घटनास्थळी हजर झाले. मयता जवळील मिळून आलेल्या मोबाईलवरुन पोलीसांना मयताची ओळख पटविण्यास मदत झाली होती. मयताचे नाव धिरुभाई छोटुलाल तडवी (वय ७० […] - [वंदे मातरम् हे केवळ गीत नाही, ते आपली प्रेरणा आहे : डॉ. मित्ताली सेठी](https://publicmirrornews.com/45659/): नंदुरबार । प्रतिनिधी “वंदे मातरम्” या गीताला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. “वंदे मातरम्” हे केवळ शब्द नाहीत, ते आपल्या स्वातंत्र्याची आणि स्वातंत्र्योत्तर काळाची खरी प्रेरणा आहे, असे उद्गार जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी काढले आहेत.   जिल्हा प्रशासनाच्या वतीने नंदुरबार शहरातील जी.टी. पाटील महाविद्यालयात आयोजित वंदे मातरम् गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त सामूहिक “वंदे मातरम्” गीत गायन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत त्या होत्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधीक्षक स्नेहा सराफ, नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, जी.टी.पी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्रसिंह रघुवंशी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य योगेश पाटील, प्रमुख वक्ते गौरीशंकर धुमाळ, विविध […] - [नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषदा सार्वत्रिक निवडणूक-२०२५; निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर](https://publicmirrornews.com/45656/): नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषदा सार्वत्रिक निवडणूक-२०२५; निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर नंदुरबार l प्रतिनिधी- नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, नवापूर आणि तळोदा या चार नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नेमणुका करण्याचे आदेश जारी केले आहेत. या नेमणुका महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांनी ठरवून दिलेल्या निकषांनुसार करण्यात आल्या असून, संबंधित आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आला आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशाप्रमाणे, निवडणूक प्रक्रिया कर्तव्यदक्ष, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. […] - [भाजपचे समर्थक शितलकुमार पटेलांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या शिवसेनेत प्रवेश](https://publicmirrornews.com/45653/): नंदुरबार l प्रतिनिधी भाजपचे खंदे समर्थक शितलकुमार पटेल यांच्यासह तालुक्यातील पातोंडा,जांभोली, करजकुपा,कोळदे, शिंदे,लहान शहादा, खोडसगाव,पळाशी येथील असंख्य शेतकरी आणि ग्रामस्थांनी शिवसेनेचा शिंदे गटात प्रवेश केला.यावेळी संपर्कप्रमुख,आ.चंद्रकांत रघुवंशी सर्वांचे स्वागत केले. नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. त्यामुळे निवडणुका लढवण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलेला असून,आता खऱ्या अर्थाने मोर्चे बांधणीला वेग आला आहे.शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेचा शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरूच आहे.   बुधवारी सायंकाळी नंदुरबार येथील भाजपाचे खंदे समर्थक शितलकुमार पटेल यांच्यासह पंचक्रोशीतील गावांमधील असंख्य शेतकरी व ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी माजी नगरसेवक किरण रघुवंशी, रविंद्र पवार,अतुल पाटील, भरत पटेल,राजू पटेल,श्रीराम […] - [नंदुरबार तालुक्यातील शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश](https://publicmirrornews.com/45649/): नंदुरबार l प्रतिनिधी- शिंदे गटाच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या विकास कार्यावर विश्वास दर्शवत भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणाऱ्यांचा सिलसिला जारी असून शनि मंडळ तीलाली, तलवाडे आणि ईंद्रहट्टी परिसरातील शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जाहीरपणे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेला आजचा पक्षप्रवेश शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना जोरदार धक्का असल्याचे मानले जात आहे. भाजपात डॉक्टर हिनाताई गावित यांचे पुनरागमन होताच अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघा पाठोपाठ नंदुरबार तालुक्यातीलही शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश करण्याची तयारी चालवली आहे. आजच्या पक्षप्रवेशातून त्याचे चित्र पाहायला मिळाले. भाजपात प्रवेश घेतलेल्यांमध्ये तिलाली […] - [डॉ. हिना गावित यांचे पुनरागमन होताच अक्कलकुवा तालुक्यातील शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश](https://publicmirrornews.com/45646/): नंदुरबार l प्रतिनिधी- भाजपात डॉक्टर हिना गावित यांचे जोरदार पुनरागमन होताच अक्कलकुवा तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश करण्याची तयारी चालवली असून शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांना या पक्षांतराचा पहिला धक्का बसला आहे. आमदार आमश्या पाडवी यांचे सुरुवातीपासून खंदे समर्थक असलेले काकडखुंट ग्रामपंचायतचे सरपंच विनोद वळवी, सोनापाटी ग्रामपंचायतचे सरपंच कुवरसिंग पाडवी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित, माजी खासदार महा संसद रत्न डॉ. हिना गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नागेशदादा पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या सोहळ्यात जाहीरपणे भाजपात प्रवेश घेतला. यामुळे शिवसेना शिंदे गटात […] - [भाजपातील पुनरागमनानंतर नंदुरबार तालुक्याच्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले महासंसदरत्न डॉ.हिना गावित यांचे भव्य स्वागत](https://publicmirrornews.com/45642/): नंदुरबार l प्रतिनिधी- भाजपातील दमदार पुनरागमनानंतर महासंसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित यांचे नंदुरबार तालुक्याच्या विविध गटातील समस्त भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतशबाजी करीत भव्य असे स्वागत आणि सत्कार केला. नंदुरबार शहरातील तसेच तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांकडून डॉक्टर हिना गावित यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या माजी खासदार तथा धडाडीच्या युवा नेत्या महा संसद रत्न डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांनी अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांसह दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी भारतीय जनता पार्टीत पुनश्च प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात मुंबई येथील प्रमुख कार्यालयात हा प्रवेश सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री […] - [शनिमांडळ येथे भाजपला खिंडार; शिंदे गटात इन्कमिंग सुरूच](https://publicmirrornews.com/45639/): नंदुरबार l प्रतिनिधी तालुक्यातील शनिमांडळ येथे भाजपला खिंडार पडलेला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात इन्कमिंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.शनिमांडळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच योगेश मोरे त्याचप्रमाणे शिवसेना उबाठाचे उपतालुकाप्रमुख सुनील पवार यांच्यासह गावातील असंख्य ग्रामस्थांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. शिवसेना भवन,आमदार कार्यालयात शनिमांडळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच योगेश अरविंद मोरे त्याचप्रमाणे शिवसेना उबाठाचे उपतालुकाप्रमुख सुनील पवार यांच्यासह अनिल राजपूत,संतोष धनगर,खंडू पाटील,किरण माळी, संजय पाटील,गोविंदा पाटील,अशोक कोळी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे स्वागत शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी व जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशींनी स्वागत केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील पाटील,शेतकी संघाचे अध्यक्ष बी.के पाटील, शिवसेना […] - [समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाच्या अधिवेशनात तापी नदीवरील पुलाला सरदार सेतू नाव देण्याचा ठराव मंजूर](https://publicmirrornews.com/45636/): नंदुरबार l प्रतिनिधी- समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचे वार्षिक अधिवेशन शनिवार रोजी सकाळी दहा वाजता प्रकाशा येथील सद्गुरू धर्मशाळा या ठिकाणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पुरुषोत्तम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या अधिवेशनात समाजहिताचे विविध ठराव मंजूर करण्यात आले. सर्वप्रथम माँ अन्नपूर्णा, स्व. अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून अधिवेशनाला सुरुवात झाली. समाजातील मृत झालेल्या समाजबांधव तसेच देशपातळीवर थोर दिवंगत व्यक्ती यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर गुजर समाजाचे भाट दादा बडोदा येथील रोहितभाई बारोट यांचे समाजाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अधिवेशनात समाजाचे अध्यक्ष दीपकभाई पुरुषोत्तम पाटील, जयश्रीबेन उर्फ […] - [नंदुरबार शहर भारतीय जनता पार्टीतर्फे लोहपुरुष सरदार पटेल जयंतीनिमित्त अभिवादन](https://publicmirrornews.com/45633/): नंदुरबार l प्रतिनिधी- येथील नंदुरबार शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. नंदुरबार शहरातील हुतात्मा स्मारक याठिकाणी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन जयंतीनिमित्त नंदुरबार शहर भाजपातर्फे अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य पंकज पाठक, भाजपाचे जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी, भाजपाचे नंदुरबार शहराध्यक्ष नरेश कांकरिया, तालुकाध्यक्ष दीपक पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मोहन खानवाणी, माणिक माळी, प्रशांत चौधरी, हेमंत कदम, भावेश गायकवाड, मोहन चौधरी, जगदीश श्रीवास्तव, अजहर काझी, पद्माबाई परदेशी, डॉ.नक्षणे आदी उपस्थित होते. भारताच्या एकीकरणाचे शिल्पकार व अखंड भारताचे प्रतीक असलेल्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रेरणादायी कार्यास वंदन […] - [एकतेचा दौडने लोहपुरुषांना नंदुरबारकरांचा सलाम](https://publicmirrornews.com/45630/): एकतेचा दौडने लोहपुरुषांना नंदुरबारकरांचा सलाम नंदुरबार l प्रतिनिधी- लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त नंदुरबार शहरात पोलीस विभागाच्या वतीने “एक भारत, श्रेष्ठ भारत” या घोषवाक्याखाली भव्य एकता दौड आयोजित करण्यात आली. या दौडीमध्ये शेकडो नागरिक, पोलीस अधिकारी-कर्मचारी, महिला, विद्यार्थी, खेळाडू तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उत्साहाने सहभागी झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी उपस्थितांना एकतेची शपथ देत “एकता दौड”ला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अप्पर पोलीस अधीक्षक आशीष कांबळे, निवासी जिल्हाधिकारी कल्पना ठुबे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन आणि इतर अधिकारी यांच्यासह नागरिकांनी उत्साहात दौड सुरु केली. नेहरू पुतळ्यापासून […] - [धडगावचा शेतकऱ्यांचा आक्रोश,मुसळधार पावसाने पिके वाहून गेली; उगवलेली कणीसे कुजली, दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी](https://publicmirrornews.com/45627/): धडगाव l प्रतिनिधी- मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधारेच्या मुसळधार पावसामुळे धडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. या अतिवृष्टीमुळे शेतातील सोयाबीन, उडीद, ज्वारीसह इतर हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसाच्या तडाख्यामुळे उभ्या पिकांना कणीस उगवले असून ती पिके पाण्यात भिजून सडण्याच्या मार्गावर आहेत. तर आधीच कापून ठेवलेली पिके पुन्हा उगवून नंतर कुजल्याने शेतकऱ्यांचे सर्वस्व वाहून गेले आहे. संततधारेमुळे शेतात पाणी साचले असून जमिनीवर चिखलाचे थर जमा झाले आहेत. अनेक ठिकाणी पिकांची मुळे पूर्णपणे कुजली असून *उत्पादनाची सर्व आशा संपुष्टात आली आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कंबर मोडली असून शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा, […] - [नंदुरबार जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा,जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन](https://publicmirrornews.com/45624/): नंदुरबार l प्रतिनिधी- नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस सतत सुरू असून आपल्या मार्फत महसूल तसेच कृषी विभागास पिकांचे पंचनामे करून पिक आणेवारी ५० टक्के आत लावण्यात यावी व विमा कंपनीस अवगत करणेबाबत तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबतचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी यांना दिले यावेळी सागर इंदानी, गजानन पाटील, सुनील पाटील, सचिन पाटील, दुर्गेश पाटील, प्रवीण पाटील, रोहिदास पाटील, महेंद्र गिरासे, नवल गिरासे, विजय पाटील, सागर पाटील, प्रदीप पाटील, नवल पाटील आदी  शेतकऱ्यासह  रयत शेतकरी संघटना  यांनी  दिले. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी बांधव असुन, चालू वर्षी सन २०२४-२५ या वर्षात अतिरीक्त पावसामुळे कापसु, सोयाबीन, पपई, मिरची, केळी,मका, बाजरी, ज्वारी यासह सर्वच पिकांचे अतोनात नुकसान […] - [कबचौउमवितर्फे ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांना पीच. डी. प्रदान,केळी उत्पादकांची आर्थिक - सामाजिक स्थिती दाखवणारे हे एकमेव व्यापक संशोधन](https://publicmirrornews.com/45620/): जळगाव l प्रतिनिधी- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातर्फे जळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप मनोरमा केशवलाल तिवारी यांना पीएच. डी. पदवी (डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी अर्थात विद्यावाचस्पती) प्रदान करण्याचे पत्र (नोटीफिकेशन) प्रदान करण्यात आले.   विद्यापिठाचे कुलगुरू प्रा. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते श्री. तिवारी यांना याबाबत अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रकुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, मार्गदर्शक प्रा. डाॅ. सुधीर भटकर, संशोधन विभागाचे सहायक कुलसचिव प्रविण चंदनकर, डाॅ. सोमनाथ वडनेरे, सुभाष तळेले उपस्थित होते.   कबचौउमविती आंतर विद्याशाखेत जनसंवाद व पत्रकारिता विभागामार्फत श्री. तिवारी यांनी सादर केलेल्या ८५० पानांच्या प्रदीर्घ संशोधन प्रबंधास विद्यापिठाने स्वीकृती दिली […] - [नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचा केंद्रीय गृह मंत्री दक्षता पदक देवुन सन्मान](https://publicmirrornews.com/45617/): नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचा केंद्रीय गृह मंत्री दक्षता पदक देवुन सन्मान नंदूरबार l प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांना ” केंद्रीय गृह मंत्री दक्षता पदक ” बहाल करून सन्मानीत करण्यात आले. सेलु पोलीस ठाणे जिल्हा परभणी येथील गुन्हा रजि. क्र. 120/2021 भा.द.वि. कलम 304 (अ), 279, 427 प्रमाणे दाखल अपघातच्या गुन्ह्याचा तपास त्यांच्याकडे देण्यात आला होता. सदर गुन्हा हा प्रथमदर्शनी अपघाताचा असल्याचे दिसून येत होते. वैद्यकीय अधिकारी यांनी मरणाचे कारण देखील अपघात असल्याचे स्पष्ट केले होते. परंतू नमूद गुन्ह्याच्या तपासात पोलीस अधीक्षक  श्रवण दत्त. एस यांना मयताची पत्नी व सेलु येथील एका इसमा […] - [सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सार्ध शताब्दी वर्षानिमित्त,केवडिया (गुजरात) येथे महाराष्ट्राचा चित्ररथ](https://publicmirrornews.com/45614/): सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सार्ध शताब्दी वर्षानिमित्त,केवडिया (गुजरात) येथे महाराष्ट्राचा चित्ररथ मुंबई l प्रतिनिधी- 31 ऑक्टोबर 2025 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सार्ध शताब्दी (150 व्या) जयंती वर्षानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत केवडिया, गुजरात येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय संचलन कार्यक्रमात यंदा प्रथमच महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ सहभागी होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे या वर्षी “स्वराज्य: एकतेचा धागा” या संकल्पनेवर हा चित्ररथ साकारण्यात आला आहे. या चित्ररथात अग्रभागी छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर विराजमान असल्याचे दर्शन घडते. त्यांच्या मागे वारकरी संप्रदायातील वारकरी यांची मूर्ती तर पार्श्वभूमीवर मराठा आरमारातील प्रसिद्ध गुराब नौका दर्शविण्यात आली आहे. या माध्यमातून राज्याच्या वैभवशाली इतिहासाची आणि एकतेची […] - [सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ विशेष स्वरूपात साजरा होणार](https://publicmirrornews.com/45611/): नंदुरबार l प्रतिनिधी- भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ३१ ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. या वर्षी त्यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने हा दिवस भव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे. हा दिवस भारताच्या एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकजुटतेचे प्रतीक असून, ५६२ संस्थान एकत्रित येऊन आधुनिक भारताची पायाभरणी करणाऱ्या सरदार पटेलांच्या अद्वितीय कार्याला अभिवादन करणार आहे.     एकतानगर येथे भव्य परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रम या वर्षीचा उत्सव नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक समृद्धीचा संगम असणाऱ्या गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एकतानगर येथे आयोजित केला जाणार आहे. हे ठिकाण “विविधतेत एकता” या भारताच्या संकल्पनेचे प्रतीक म्हणून निवडले गेले आहे. […] - [शिवसेनेला सन्मान दिल्यास युतीने निवडणुका लढवू; आ.चंद्रकांत रघुवंशींच्या मानस](https://publicmirrornews.com/45607/): शहादा l प्रतिनिधी पहिल्यांदा नगरपालिकेच्या निवडणुका होतील की जिल्हा परिषदेच्या. याबाबत संभ्रमावस्था असून, जिल्ह्यात सर्वच नगरपालिकांच्या निवडणुका लढवण्यासाठी शिवसेनेची तयारी आहे.पण,जे आमच्यासोबत सन्मानाने राहतील किंवा आम्हाला बरोबर घेतील त्यांच्याच सोबत युती करू असा मानस शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केला.   शहादा तालुक्यातील वैजाली येथे शिवसेनेचा मेळावा व प्रवेश सोहळा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. आ.रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील शहादा तालुक्यात असलेल्या चारही जि.प गटात शिवसेनेचे उमेदवार देण्यात येतील. विरोधकांकडून शिवसेनेला सोबत घेणार नसल्याचे सांगितले जात आहे.त्यामुळे नंदुरबार तालुक्यात सर्वच ठिकाणी जि.प गटात शिवसेनेचे उमेदवार निवडणुका लढवण्यासाठी […] - [शेतकऱ्यांना ताबडतोब भरपाई द्या; भाजपाची मागणी](https://publicmirrornews.com/45604/): शेतकऱ्यांना ताबडतोब भरपाई द्या; भाजपाची मागणी नंदुरबार l प्रतिनिधी– परतीच्या वादळी पावसाने धुमाकूळ घालून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केलेले असतानाच आता पुन्हा अवकाळी पावसाने लागोपाठ तडाखा देऊन शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने पंचनामे करून व मदत मिळवून देऊन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर आधार द्यावा अशी मागणी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील, माजी जि प सदस्य प्रवीण (मुन्ना) पाटील आदींनी निवेदनाद्वारे केली. नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे. […] - [डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते नंदुरबारच्या ई-बस सेवेचा शुभारंभ](https://publicmirrornews.com/45601/): डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते नंदुरबारच्या ई-बस सेवेचा शुभारंभ नंदुरबार l प्रतिनिधी- नंदुरबार बस आगारासाठी सद्य स्थितीत 10 इलेक्ट्रिक बस दाखल झालेल्या असून महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी ई-बस सेवेचा शानदार शुभारंभ करण्यात आला. डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते याप्रसंगी बसचे उद्घाटन करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यातील बस सेवा आणखी सुधारित व्हावी तसेच ग्रामीण भागातील प्रवास अधिक सुखकारक करणाऱ्या सुधारणा केल्या जाव्यात, असे सांगून आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी इ बस सेवेमुळे बस आगाराची सेवा आणखी गतिमान होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान उपस्थित प्रमुख अधिकाऱ्यांशी बोलून डॉक्टर […] - [स्थानिक स्वराज्य निवडणूका म्हणजे कार्यकर्त्यांना संधी देण्याची निवडणूक : भाई नगराळे](https://publicmirrornews.com/45598/): नंदुरबार l प्रतिनिधी- बूथ मॅनेजमेंट, त्याचप्रमाणे बूथ क्षेत्रातील मतदार याद्या मतचोरी होऊ नये म्हणून नीट तपासून घ्यावी, एकाच पत्त्यावर किती मतदारांची नोंदणी झालेली आहे हे तपासून प्रत्येक मतदाराची खात्री करून घ्यावी. जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या निवडणूक आहेत. त्यांचा सन्मान करण्याची वेळ आहे असे प्रतिपादन भाई नगराळे यांनी केले. नंदुरबार जिल्हा व तालुका कॉंग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा नंदुरबार जिल्हा प्रभारी भाई नगराळे उपस्थित होते. यावेळी खा.ऍड.गोवाल पाडवी,माजी मंत्री ऍड.के.सी.पाडवी, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस […] - [आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल : प्रदेश महामंत्री विजय चौधरी](https://publicmirrornews.com/45594/): नंदुरबार l प्रतिनिधी – जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. कुठल्याही परिस्थितीत जिल्ह्यातील जिल्हा परिषद व सर्व नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवायचाच या निर्धाराने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी केले. नुकतेच विजय चौधरी यांचे नंदुरबार येथे आगमन झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, मंडळाध्यक्ष व मंडळाचे सरचिटणीस यांची बैठक भाजपा जिल्हा कार्यालय “विजयपर्व” नंदुरबार कार्यालयात प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.   याप्रसंगी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना विजय […] - [आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते गाय वासरू शिल्पाचे लोकार्पण](https://publicmirrornews.com/45591/): नंदुरबार l प्रतिनिधी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वसुबारसचे औचित्य साधून शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शहरातील महाराणा प्रताप पुतळ्याजवळ बसवण्यात आलेल्या गाय वासरूचा शिल्पाचे शुक्रवार सायंकाळी लोकार्पण करण्यात आले. शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतून आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाचा वतीने शहरातील महाराणा प्रताप पुतळ्याजवळ गाय वासरूचे शिल्प बसवण्यात आले आहे.हिंदू धर्म संस्कृतीमध्ये गाईला मातेचे रूप मानले गेले असल्याने तिला गोमातेचा दर्जा देण्यात आलेला आहे. शुक्रवार दीपोत्सवाचा पहिल्याच दिवशी वसुबारसचे औचित्य साधून शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सायंकाळी 6 वाजता लोकार्पण करण्यात आले.   यावेळी माजी नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी,शिवसेना जिल्हा प्रमुख माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,माजी सभापती मनिषा वळवी,माजी […] - [चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे : पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे](https://publicmirrornews.com/45588/): नंदुरबार l प्रतिनिधी- चांदसैली घाटात झालेल्या भीषण अपघातानंतर आज राज्याचे क्रिडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल जखमींची भेट देऊन त्यांची विचारपूस केली. या वेळी त्यांनी जखमींना सर्वतोपरी उपचार मिळावेत यासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील चांदसैली घाटात पिकअप गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात अनेकजण जखमी झाले असून काहींचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी तीव्र दु:ख व्यक्त करत मृत्यूमुखी पडलेल्या माता-भगिनींप्रती संवेदना प्रकट केल्या. अपघातानंतर पालकमंत्री कोकाटे यांनी आज सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देऊन जखमी नागरिकांची प्रकृती जाणून घेतली. रुग्णालयातील डॉक्टर […] - [शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे](https://publicmirrornews.com/45585/): नंदुरबार l प्रतिनिधी- “निःस्वार्थ भावनेने समाजाच्या सुरक्षेसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या पोलीस बांधवांचे शौर्य, त्याग आणि सेवा भाव हेच त्यांच्या कर्तृत्वाची खरी ओळख आहे. त्यांचा त्याग व्यर्थ जाऊ नये, त्यांच्या कार्याची स्मृती जिवंत ठेवण्यासाठी हे स्मारक उभारले आहे,” असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक व औकाफ मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले. नंदुरबार येथे उभारण्यात आलेल्या पोलीस शहीद स्मारकाचे अनावरण त्यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार राजेश पाडवी, आमदार आमशा पाडवी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस. अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, डॉ. अभिजित मोरे, प्रतिभा शिंदे अन्य अधिकारी व नागरिक उपस्थित होते. […] - [निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी](https://publicmirrornews.com/45582/):   नंदुरबार l प्रतिनिधी जिल्ह्याची आणि तालुक्याच्या जनतेची प्रामाणिक सेवा केली आहे.निवडून येणाऱ्या व्यक्तींनाच तिकिटासाठी प्राधान्य देण्यात येईल. ज्यांना निवडणुक लढवायची असेल त्यांनी पक्षाकडे अर्ज करावेत. त्यांच्या नक्की विचार करण्यात येईल. निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरण्यात येऊ नये. जनता सर्व ओळखून आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार तालुक्यातील कोळदा व खोंडामळी येथे शिवसैनिकांचा मेळवा घेण्यात आली त्याप्रसंगी उपस्थितितांना आ. रघुवंशी यांनी मार्गदर्शन केले त्याप्रसंगी ते बोलत होते. पुढ ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या असतात. आता कार्यकर्त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडायला पाहिजे. पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे […] - [नंदुरबार जिल्ह्याला मिळणार सुमारे 54 लाख रुपयांचा निधी](https://publicmirrornews.com/45580/): नंदुरबार l प्रतिनिधी- शासनाने नंदुरबार जिल्ह्याचे लोकप्रिय नेते माजी आदिवासी विकास मंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुमारे 54 लाख रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे.   हा निधी शेतकऱ्यांच्या थेट बँक अकाउंट मध्ये जमा होणार असून 931 शेतकरी या अतिवृष्टीमुळे बाधित झाले होते व त्यांचे 445 हेक्टर शेत पिकाचे नुकसान झाले होते. डॉक्टर विजयकुमार गावित यांनी तातडीने प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन जात, धर्म, पक्ष न पाहता शासकीय यंत्रणेला तात्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करण्याबाबत निर्देश दिले होते.   शासकीय यंत्रणेने भर पावसात शेत बांधावर जाऊन पंचनामे […] - [बनारस येथे शिकणाऱ्या धडगाव तालुक्यातील युवकाविरुद्ध प्रक्षोभक व्हिडिओ तयार केल्याप्रमाणे गुन्हा दाखल](https://publicmirrornews.com/45577/): नंदुरबार l प्रतिनिधी- बनारस येथील विद्यापीठात शिकणाऱ्या धडगाव तालुक्यातील रहिवासी असलेल्या युवा कारणे प्रक्षोभक व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध नंदुरबार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, सार्वजनिक शांतता भंग होईल अशा प्रकारचे व्हिडीओ प्रसारित केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.     पोलिस सूत्रांनुसार, धडगाव तालुक्यातील बोरवण येथील युवकाने २१ सप्टेंबर रोजी बनारस येथून त्याच्या युट्यूब चॅनेलवर एका घटनेसंदर्भातील माहिती पूर्णपणे जाणून न घेता त्यावर प्रक्षोभक पद्धतीचा व्हिडीओ तयार केला होता. तो प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध फिर्याद दाखल करून गुन्हा दाखल केला होता. त्यास अटक करून दोन दिवसांची […] - [अस्तंबा यात्रेतील मृतांना राज्य सरकारने दहा लाखाची मदत जाहीर करावी, खासदार गोवाल पाडवी व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी](https://publicmirrornews.com/45574/): अस्तंबा यात्रेतील मृतांना राज्य सरकारने दहा लाखाची मदत जाहीर करावी, खासदार गोवाल पाडवी व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी नंदुरबार l प्रतिनिधी नंदुरबार जिल्हयातील सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या अस्तंबा ऋषर्षीची यात्रा करुन घरी परतत असतांना, झालेल्या भिषण अपघातामध्ये नंदुरबार तालुक्यातील 8 मयतांना प्रत्येकी 10 लाख रुपये मदत जाहीर करण्याबाबतची मागणी खासदार ऍड.गोवाल पाडवी व नंदुरबार विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.   नंदुरबार जिल्हयातील धडगांव तालुक्यात सातपुडा पर्वत रांगेत अस्तंबा येथे दरवर्षी दीपोत्सवानिमित्त धनत्रयोदशीला 4 ते 5 दिवस अश्वत्थामा ऋषींची यात्रा भरत असते. येथे महाराष्ट्र राज्यतुन […] - ['समुत्कर्ष' ला राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार](https://publicmirrornews.com/45571/): नंदुरबार l प्रतिनिधी- दिवंगत माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जळगावच्या नोबेल फाउंडेशन,नोबेल विज्ञानप्रसारक बहुउद्देशीय संस्था व अमळनेरच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलतर्फे नुकतीच राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.यामध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या नोबेल विज्ञान प्रतिभा पुरस्कारासाठी नंदुरबार येथील समुत्कर्ष बहुउद्देशीय संस्थेचे संचालक ललित महाजन यांची निवड करण्यात आली आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रचार व प्रसारासाठी कार्य करीत असणाऱ्या संस्था, शिक्षक व विद्यार्थ्यांना दरवर्षी राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार देवून गौरविण्यात येते. यासाठी पुरस्काराने नीरज अग्रवाल, डॉ.प्रमोद माहुलीकर, डॉ.संजय शेखावत, जामनेर येथील पोदार जिनियस इंटरनॅशनल स्कूलचे सहकार्य लाभते. विज्ञान पुरस्कार संस्था गटासाठी २०२५ या […] - [पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा](https://publicmirrornews.com/45567/): नंदुरबार l प्रतिनिधी- पथराई ता. नंदुरबार येथील के.डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसानिमित्त दरवर्षी वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात येतो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शरद पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून प्रल्हाद संदानशिव होते. विद्यालयातील आकाश तडवी व खुशाल पाटील या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर उत्स्फूर्त वाचन स्पर्धेत श्याम पावरा, हितेश कोळी, वीर पावरा, हर्षल वाडीले, निखिल वसावे, चिन्मय पाटील, प्रणव धनगर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.वरील स्पर्धकांपैकी श्याम पावरा प्रथम हितेश कोळी द्वितीय तर हर्षल वाडीले हा विद्यार्थी तृतीय क्रमांकाने यशस्वी ठरला. श्रीमती शुभांगी पाटील व […] - [भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साजरी केली दिवाळी व भाऊबीज](https://publicmirrornews.com/45563/): नंदुरबार l प्रतिनिधी- नंदुरबार तालुक्यातील भालेर येथे काकेश्वर विद्या प्रसारक संस्था संचलित द फ्युचर स्टेप स्कूल येथे दिवाळी व भाऊबीज साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती क.पू. पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयचे प्राचार्य पी. एस. सूर्यवंशी , पर्यवेक्षक पी. डी. पाटील , तसेच पालक प्रतिनिधी देवीदास महाजन उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता यांच्या पूजनाने झाली. संपूर्ण शाळा रंगीबेरंगी फुलांनी, कंदिलांनी आणि आकर्षक रांगोळ्यांनी सजविण्यात आली होती. सर्व विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. यानंतर विद्यार्थ्यांनी दिवाळीवर आधारित गाणी, नृत्ये आणि भाषणे सादर केली. भाऊबीज कार्यक्रमात शाळेतील मुलींनी पारंपरिक […] - [वैजाली ते नांदर्डे पुलाजवळ होणार पर्यायी रस्ता, ग्रामस्थ आक्रमक, बांधकाम विभागाने दिले आश्वासन](https://publicmirrornews.com/45560/): नंदुरबार l प्रतिनिधी- शाळा तालुक्यातील वैजाली ते नांदेड दरम्यान असलेल्या वाकी नदीवरील पुलाचे बांधकाम त्वरित करण्यात यावी या मागण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. त्यादरम्यान रास्ता रोको करण्यात येणार होता त्याची दाखल घेत बांधकाम विभागाने या रस्त्यावरील पुलाजवा पर्यायी रस्ता उभारण्यात येण्याचे आश्वासन दिले त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आली.   शहादा तालुक्यातील वैजाली ते नांदर्डे दरम्यान असलेल्या वाकी नदीवर पुलाचे बांधकाम त्वरित न झाल्यास दिनांक 16 ऑक्टोबर 2025 गुरुवार रोजी रास्ता रोको आंदोलन छेडण्याच्या इशारा परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व संबंधित प्रशासनाला देण्यात आला होता. त्याची दखल घेत शहादा उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कनवारिया तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी […] - [गाय वासरूच्या शिल्पाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण](https://publicmirrornews.com/45557/): नंदुरबार l प्रतिनिधी शहरातील महाराणा प्रताप पुतळ्याजवळ बसवण्यात आलेल्या गाय वासरूचा शिल्पाचे आज शुक्रवार दि.17 ऑक्टोंबर रोजी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. गाय आणि वासरू हे आई आणि तिच्या बाळामधील मातृप्रेम आणि संगोपनाचे प्रतीक आहे.गाय वासरूला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व असून, शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतून शहरातील महाराणा प्रताप पुतळ्याजवळ गाय वासरूचे शिल्प बसवण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण शुक्रवार दीपोत्सवाचा पहिल्याच दिवशी वसुबारसचे औचित्य साधून शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सायंकाळी 6 वाजता लोकार्पण करण्यात येणार आहे.   लोकार्पण कार्यक्रमास सर्व नागरिक, गोरक्षकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आ. चंद्रकांत रघुवंशी […] - [एक हात मदतीचा” आवाहनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद](https://publicmirrornews.com/45554/): नंदुरबार l प्रतिनिधी- राज्यातील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर, शासनाच्या जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केलेल्या “एक हात मदतीचा” या आवाहनाला जिल्ह्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे अध्यक्ष डॉ. तुषार धामणे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. या अभियानांतर्गत आज रोजी माय चाईल्ड पब्लिक स्कूल, नंदुरबार यांच्यातर्फे रुपये 23 हजारचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्यामार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षास सुपूर्त करण्यात आला आहे. यापूर्वीही जिल्ह्यातील अनेक दानशूर व्यक्ती व संस्थांनी या मदतकार्याला हातभार लावला आहे. आजपर्यंत मदत करणाऱ्यांमध्ये […] - [जिल्हा पोलीस सायबर सेलने 34 लाख तक्रारदारांना केले परत](https://publicmirrornews.com/45551/): नंदुरबार l प्रतिनिधी- राज्यातील सायबर गुन्हयांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे उद्देशाने महाराष्ट्र राज्य सायबर सेलतर्फे “सायबर जनजागृती उपक्रम ऑक्टोबर 2025” हया विशेष अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत नागरिकांना विविध प्रकारच्या ऑनलाईन फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. त्यानिमित्ताने आज रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माहिती देतांना पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, या उपक्रमांतर्गत जिल्हा पोलीस दलातर्फे विविध स्तरावर जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत असून ऑक्टोबर 2025 या महिन्यात देखील शाळा, महाविदयालये, खाजगी संस्था व इतर सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना सायबर फसवणूकीशी संबंधित OTP फसवणूक, बैंकिंग संबंधी फसवणूक, बनावट वेबसाईट्स, फिशींग लिंक्स, […] - [दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खान्देश स्तरीय पुरुषोत्तम चषक उत्साहात](https://publicmirrornews.com/45547/): शहादा l प्रतिनिधी- पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पुरुषोत्तम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खान्देश स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा पुरुषोत्तम चषक -२०२५ चे आयोजन शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे डी.एन.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सरदार पटेल सभागृहात उत्साहात संपन्न झाले. सर्वप्रथम बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन दीपकभाई पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माँ सरस्वती, स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या प्रतिमेच पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर बुद्धिबळ पटावर स्पर्धेतील सर्वात लहान वयाच्या खेळाडू धगधगे तेजस (वय ४ वर्षे), ठाकरे दर्शिका (वय ५ वर्षे) यांच्या सोबत बुद्धिबळ खेळून करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनीलभाई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी […] - [महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर,५० हजार कोटींची गुंतवणूक, पाच लाखांवर रोजगार निर्मिती](https://publicmirrornews.com/45544/): महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर,५० हजार कोटींची गुंतवणूक, पाच लाखांवर रोजगार निर्मिती नंदुरबार l प्रतिनिधी- राज्यातील शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ ला आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यातून जागतिक स्तरावर आणि देशांतर्गत बांबू उत्पादनात महाराष्ट्राचे स्थापन आणखी बळकट करण्यात येणार आहे. राष्ट्रीय बांबू मिशन आणि महाराष्ट्र मिशन २०२३ शी सुसंगत असे हे धोरण असेल. पुढील पाच वर्षांच्या कालावधीत हे धोरण राबविले जाईल. या कालावधीत आणि त्यानंतर पुढील दहा वर्षांत राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक येणे अपेक्षित आहे. यातून प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरिता ५ लाखांहून अधिक […] - [जंगल नसलेल्या, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्येच्या गावांचाही 'पेसा'मध्ये समावेश करावा : उपमुख्यमंत्री अजित पवार](https://publicmirrornews.com/45541/): मुंबई l प्रतिनिधी- राज्यात सुमारे १७ हजार गावे सामुदायिक वन हक्क मिळण्यासाठी पात्र असून आतापर्यंत केवळ ५ हजार गावांना सामुदायिक वन हक्क देण्यात आले आहेत. उर्वरित गावांना सामुदायिक वन हक्क देण्यासंदर्भात आदिवासी विकास व अन्य सर्व संबंधित यंत्रणांनी प्राधान्याने कार्यवाही करावी. वंचित आदिवासी, गरीब समाजाला सर्व योजनांचे लाभ द्यावेत. अंशतः वन हक्काच्या पात्र दाव्यांवर तातडीने सुनावणी घेऊन जळगाव,धुळे, नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनी ते निकाली काढावेत,असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.   उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात वन हक्क कायदा २००६ च्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात तसेच जळगाव, धुळे,नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या विविध विषयासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.   […] - [राजकारण करतांना भाऊबंदकी कायम ठेवा; आ. चंद्रकांत रघुवंशींच्या शिवसैनिकांना सल्ला](https://publicmirrornews.com/45537/): नंदुरबार l प्रतिनिधी निवडणुकीच्या काळात शिवसैनिकांनी एकमेकांना साथ देऊन आपापसातील विश्वास व्यक्त करीत कुठल्याही प्रलोभनांना ग्रामस्थांनी बळी पडू नये. पक्षाकडून ज्या उमेदवाराला निवडणुकीत तिकीट देण्यात त्यास सर्वांनी मदत करावी.राजकारण करीत असताना भाऊबंदकी कायम ठेवा असा सल्ला शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसैनिकांना दिला.दरम्यान,शनिमांडळ गावात झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत असंख्य ग्रामस्थांनी पक्षात प्रवेश केला.   शनिमांडळ ता.नंदुरबार येथे शिवसेना शिंदे गटाची बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी आमदार रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले त्या प्रसंगी ते बोलत होते. तत्पूर्वी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी साडेसाती मुक्तपीठ असलेल्या शनिदेव मंदिरात जाऊन अभिषेक अन् महाआरती केली.यावेळी आ.रघुवंशी म्हणाले, गेल्या निवडणुकीत आपल्या अनेक उमेदवारांना थोड्याशा फरकांनी पराभव पत्करावा लागला. […] - [जिल्ह्यात 5 बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल, नऊ जणांना दिल्या नोटीस](https://publicmirrornews.com/45534/): जिल्ह्यात 5 बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल, नऊ जणांना दिल्या नोटीस नंदुरबार l प्रतिनिधी- नंदुरबार आरोग्य विभागातर्फे आतापर्यंत पाच बोगस डॉक्टर आणि विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जळगाव तालुक्यातील नऊ डॉक्टर यांना नोटीस देण्यात आल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यात आतापर्यंत ५ बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. डॉक्टर शोधमोहिम अद्यापही सुरु आहे. यांतर्गत धडगाव तालुक्यात येत्या दोन दिवसात दोघांवर कारवाईची शक्यता आहे.धडगाव येथील तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची मागणी केल्यानंतर ९ जणांनी कागदपत्रे किंवा वैद्यकीय व्यवसायाचे पुरावे दिलेले नाहीत. यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार आहे. धडगाव शहरात नुकत्याच एकावर कारवाई करण्यात आली आहे. संशयित बोगस डॉक्टर याठिकाणी तब्बल १३ […] - [पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम](https://publicmirrornews.com/45531/): पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम नंदुरबार l प्रतिनिधी- शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.१३ ऑक्टोंबर रोजी अभिष्टचिंतनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.   पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या मंडळ संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सर विश्वेश्वरैय्या सभागृहात अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त हितचिंतक मित्र परिवारातर्फे आज दि. १३ ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता अभिष्टचिंतन कार्यक्रम होईल.     तसेच सकाळी ११ वाजता अभियांत्रिकी महाविद्यालयातील सरदार पटेल सभागृहात प्राथमिक ते महाविद्यालयीन व खुल्या गटातील […] - [के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वायुसेना दिन उत्साहात साजरा](https://publicmirrornews.com/45526/): नंदुरबार l प्रतिनिधी- पथराई ता. नंदुरबार येथील के.डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात वायुसेना दिन उत्साहात साजरा करण्यात आला.   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शरद बागुल तर प्रमुख अतिथी म्हणून नवनियुक्त कमांडर शशिकांत मराठे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्रकुमार गावित, संचालिका ईलाताई गावित, आदिवासी युवक क्रीडा कल्याण मंडळाच्या सचिव डॉ.विभूतीताई गावित, तसेच आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीच्या सचिव ऋषिका गावित यांचे मार्गदर्शन लाभले.   कार्यक्रमाची सुरुवात आजपर्यंत भारताच्या संरक्षण क्षेत्रात वायुसेनेतील ज्या वीर सैनिकांनी आपले योगदान दिले व देशाच्या संरक्षणासाठी शहीद झाले त्यांना कमांडंट व प्राचार्य यांच्यामार्फत रीथ अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. शिक्षण निदेशक […] - [भारतीय सशस्त्र दलाच्या अधिकारी पदासाठी पूर्व प्रशिक्षण](https://publicmirrornews.com/45521/): नंदुरबार l प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनातर्फे भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलात अधिकारी म्हणून भरती होण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांसाठी नाशिक येथे मोफत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे असे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (डॉ.) निलेश पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. शासनातर्फे नवयुवक व नवयुवतीसाठी 03 नोव्हेंबर 2025 ते 12 नोव्हेंबर, 2025 या कालावधीत छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे सेवा निवड मंडळ (SSB) 63 व्या सत्राचे आयोजन करण्यात आले असून या कालावधीत प्रशिक्षणार्थ्यांना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन देण्यात येणार आहे. जिल्ह्यांतील इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 29 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, […] - [सहकार महर्षी, शिक्षण महर्षी स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित शिबिरात 203 रक्तदात्यांनी केले रक्तदान](https://publicmirrornews.com/45517/): सहकार महर्षी, शिक्षण महर्षी स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित शिबिरात 203 रक्तदात्यांनी केले रक्तदान शहादा l प्रतिनिधी- दरवर्षाप्रमाणे या वर्षीही परिसराचे भाग्यविधाते, सहकार महर्षी, शिक्षण महर्षी स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने श्री.पी के अण्णा पाटील फाऊंडेशन, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, शहादा तालुका खरेदी विक्री संघ, समस्त लेवा पाटीदार गुजर समाज व विविध शहर व ग्राम लेवा पाटीदार ग्लोबल गुजर मंडळ (वीएसजीजीएम) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्यासह मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, कृषी बाजार समितीचे माजी सभापती सुनिल पाटील, कृषी बाजार समितीचे माजी उपसभापती रविंद्र राऊळ, रमाकांत पाटील, माजी प्राचार्य […] - [श्री.पी.के.अण्णा पाटील फाऊंडेशन व व्हीएसजीजीएम द्वारा आयोजित कर्करोग निदान शिबिरात ७१ जणांची तपासणी](https://publicmirrornews.com/45514/): शहादा l प्रतिनिधी शहादा येथे श्री.पी.के.अण्णा पाटील फाऊंडेशन व व्हीएसजीजीएम यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग निदान शिबिराचे आयोजन पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे डी.एन.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले होते. त्यात तोंडाचा कर्करोग आणि स्तन कर्करोग निदान शिबिरात ७१ नागरिकांची तपासणी करण्यात आली.   स्व. अण्णासाहेब पी.के. पाटील यांच्या जयंतीनिमित्त विद्याविहार-लोणखेडा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात व्हीएसजीजीएमच्या सहयोगाने कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबिराचे उद्घाटन पद्मश्री डॉ तात्याराव लहाने, आमदार राजेश पाडवी व मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, संचालक रमाकांत पाटील, ओरल कैंसर स्क्रीनिंग एक्सपर्ट डॉ.सोनल […] ## Pages - [Home](https://publicmirrornews.com/): edit post क्राईम भालेर येथे अनोळखी युवकाचा डोक्यात वार करून खून, अज्ञाता विरुद्ध गुन्हा by Mahesh PatilJune 27, 2021 edit post आरोग्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी ५३२ कोटीच्या अंदाजपत्रकाला मंजुरी by Mahesh PatilJune 25, 2021 edit post शैक्षणिक नवापूर येथील जुना सरकारी दवाखाच्या जागेवर नियोजीत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे बांधकाम करावे : माजी जि.प.अध्यक्ष भरत गावीत यांची मागणी by Mahesh PatilJune 25, 2021 edit post सामाजिक पतीचे निधन झालेल्या महिलेला आर्थिक मदतीचा धनादेश by Mahesh PatilJune 25, 2021 edit post आरोग्य खडकी येथे बाल उपचार केंद्र सुरु करा- राधाकृष्ण गमे by Mahesh PatilJune 24, 2021 edit post क्राईम सुरत येथील […] - [Sample Page](https://publicmirrornews.com/sample-page/): This is an example page. It’s different from a blog post because it will stay in one place and will show up in your site navigation (in most themes). Most people start with an About page that introduces them to potential site visitors. It might say something like this: Hi there! I’m a bike messenger by day, aspiring actor by night, and this is my website. I live in Los Angeles, have a great dog named Jack, and I like piña coladas. (And gettin’ caught in the rain.) …or something like this: The XYZ Doohickey Company was founded in 1971, […] [comment]: # (Generated by Hostinger Tools Plugin)