म्हसावद l प्रतिनिधी
भारतीय मानवाधिकार रक्षा परिषदेच्या महाराष्ट्र राज्याच्या “मुख्य समन्वयक” पदी प्रा. हितेश मक्कन पटेल रा.बामखेडा त त ता शहादा यांची नियुक्ती करण्यात आली.

प्रा.हितेश पटेल हे अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रिडा, धार्मिक, राजकिय क्षेत्रात कार्यरत आहेत, ते अखिल भारतीय गुर्जर महासभेचे युवा कार्यकारणीचे महाराष्ट्र राज्य संयोजक, स्वाभिमानी शिक्षक शिक्षकेतर संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रांतसदस्य तथा नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष, व्हीएसजीजीएम सदस्य अशा अनेक संघटनांच्या पदावर काम करण्याचा त्यांना प्रदिर्घ अनुभव आहे.
प्रा.हितेश पटेल यांची नीती आयोग (भारत सरकार) द्वारा नोंदणीकृत भारतीय मानवाधिकार रक्षा परिषदेच्या (Human Rights council of india) “महाराष्ट्र राज्याच्या मुख्य समन्वयक “पदी नियुक्ती करण्यात आली असून सदर नियुक्तीचे आदेश निवृत्त न्यायाधीश व ग्राहक मंचाचे माजी अध्यक्ष ब्रिन्दावन मंडल यांच्या सल्ल्याने व श जनार्धन मोंडल (नीती आयोग माजी सहसंचालक, ग्राहक मंचाचे चेयरमन आणि चंद्र शेखर डे (नीती आयोगाचे सरचिटणीस), महाराष्ट्र राज्य सरचिटणीस डॉ. प्रफुल्ल पाटील यांच्या द्वारे नियुक्ती करण्यात आली.
मानवाधिकार म्हणजे प्रत्येक माणसाला निसर्गदत्त मुलभुत अधिकार, हे अधिकार त्याला जन्मत:च मिळतात व सदर अधिकार अबाधित ठेवण्याची जवाबदारी प्रत्येकाची असते पण, तरीही वेळोवेळी त्यावर आक्रमण होतांना दिसते व ते अधिकार अबाधित राहण्यासाठी प्रयत्नांची तसेच सतत जागरुक राहण्याची आवश्यकता असते.
आयोगाला प्राप्त होणार्या ५० टक्के तक्रारीपैकी कार्यक्षेत्रात न बसणारी काही तक्रारी असतात या नॉन मेन्टेनेबल तक्रारी संदर्भात जनजागृती करणे, मानवी हक्काचे ऊल्लंघन झालेल्या प्रकरणांची जवाबदार यंत्रणेला दखल घेण्यास मदत करणे किंवा भाग पाडणे,
मानवतेचा व मानवी हक्काच्या प्रचार करणे आदी कार्य या माध्यमातुन केले जातात.या निवडी बद्दल प्रा हितेश पटेल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.









