नंदुुरबार l प्रतिनिधी
देशाचे केंद्रीय स्वास्थ्य व परिवार कल्याण राज्य मंत्री ना. डॉ.मनसुख मांडवीय हे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचे भव्यदिव्य स्वागत भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली केले जाणार आहे.
भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी यांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, आज शनिवार दि. 23 एप्रिल 2022 रोजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. डॉ.मनसुख मांडवीया हे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री ना. डॉ.मनसुख मांडवीया हे धडाकेबाज कार्यशैली साठी ओळखले जातात. नंदुरबार दौऱ्यात मा.मंत्री मांडवीया हे शासकीय नंदुरबार जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन याठिकाणी करण्यात आलेल्या विकासात्मक सोयी-सुविधांची माहिती घेऊन पाहणी करतील. तसेच वैद्यकीय महाविद्यालय संदर्भात माहिती घेतील. त्याचबरोबर केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा योजना संबंधीत, येथील आरोग्य प्रश्नां संबंधीत व आरोग्य सुविधा आणि विकास कामांची माहिती जाणून घेण्यासाठी सर्वसंबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतील.
दरम्यान, मंत्री महोदय यांचे भव्यदिव्य स्वागत भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व खा.डॉ.हिना गावित, आ.डॉ.विजयकुमार गावित, आ.राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत भाजपा जिल्हा कार्यालय “विजयपर्व” येथे सायंकाळी 4.30 वा. करण्यात येणार आहे. तरी सर्व लोकप्रतिनिधी, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, मंडळअध्यक्ष व सरचिटणीस, मोर्चा, आघाडी अध्यक्ष व सरचिटणीस, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य , सभापती, पंचायत समिती सदस्य, कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे, आवाहन जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी यांनी केले आहे.










