नंदुरबार l प्रतिनिधी

अभाविप चे 56 वे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन बाल हुतात्मा शिरिषकुमार नगरी, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह नंदुरबार येथे संपन्न होत आहे. आज दि. 11 फेब्रुवारी रोजी या अधिवेशनाला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा.सारंग जोशी आणि प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांच्या हस्ते ध्वजारोहण प्रारंभ करण्यात आला.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, आपल्या विस्तारात्मक कार्यासाठी नेहमीच ओळखली जाते. शैक्षणिक वर्ष २०२१ – २०२२ च्या प्रदेश अधिवेशनात अभाविप महाराष्ट्र प्रदेशाची पुनर्रचना करून, पश्चिम महाराष्ट्र प्रांत व देवगिरी प्रांत असे २ नविन प्रांत घोषित करण्यात आले.
राष्ट्रपुनर्निमाणाच्या कार्यात शिक्षण आणि विद्यार्थ्यांना आपल केंद्र मानून कार्य करत असलेल्या अभाविप ने यावर्षी केलेल्या विस्तारात्मक निर्णयात दोन प्रदेश अध्यक्ष तसेच दोन प्रदेश मंत्री अशा घोषणा केल्या. पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. निर्भय कुमार विसपुते तर प्रदेश मंत्री म्हणून अनिल ठोंबरे यांची निवड करण्यात आली. आणि देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. सारंग जोशी व प्रदेश मंत्री म्हणून कु. अंकिता पवार यांची निवड करण्यात आली.
अभाविप चे ५६ वे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन बाल हुतात्मा शिरिष कुमार नगरी, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, नंदुरबार येथे संपन्न होत आहे. दि. ११ फेब्रुवारी ला या अधिवेशनाला प्रारंभ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा. सारंग जोशी आणि प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाला.तसेच, २०२० -२०२१ या वर्षातील विद्यार्थी परिषदेच्या कार्याचे दर्शन घडविणाऱ्या स्वातंत्र्य सेनानी तंट्या भिल्ल प्रदर्शनीचे उद्घाटन नंदुरबार नगरपरिषदेच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ. रत्नाताई रघुवंशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. प्रदेशमंत्रीप्रतीवेदनात सिद्धेश्वर लटपटे यांनी वर्ष २०२०-२०२१ च्या अभाविप च्या कार्याचे सिंहावलोकन केले. यावेळी मंचावर प्रा.सारंग जोशी, अभाविप महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री अभिजीत पाटील उपस्थित होते. दिनांक १२ व १३ फेब्रुवारी या कालावधीत अभाविप चे ५६ वे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन नंदनगरीत संपन्न होणार आहे. या मध्ये विविध शैक्षणिक विषयांवर चर्चा आणि निर्णय होणार आहेत.









